JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp सुरक्षित प्लॅटफॉर्म नाही, सायबर सिक्योरिटी कंपनीने केलं अलर्ट

WhatsApp सुरक्षित प्लॅटफॉर्म नाही, सायबर सिक्योरिटी कंपनीने केलं अलर्ट

‘WhatsApp सुरक्षित प्लॅटफॉर्म नाही. फ्रॉडस्टर्स WhatsApp युजर्सच्या डेटावर नजर ठेवून असतात आणि मोठी संधी मिळतात त्याचा गैरवापर केला जातो.’

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 जानेवारी : काही दिवसांपूर्वी WhatsApp च्या नावाने एक मोठा घोटाळा समोर आला होता. WhatsApp वर Rediroff.ru नावाने फसवणुकीला सुरुवात झाली होती. या फिशिंग घोटाळ्याद्वारे फ्रॉडस्टर्स सोशल इंजिनियरिंग मेथडचा वापर करुन वैयक्तिक आणि फायनेंशियल माहितीपर्यंत पोहोचत होते. फसवणूक करणारे सर्वात आधी युजरला WhatsApp वर लिंक पाठवतात. ज्यावेळी युजर लिंकवर क्लिक करतात, त्यावेळी नवं वेबपेज ओपन होतं. या वेबपेजमध्ये एक सर्व्हे करावा लागतो. सर्व्हे करुन युजर चांगलं बक्षिस जिंकू शकतो असं सांगितलं जातं. या सर्व्हेमधून युजर्सची संपूर्ण माहिती स्कॅमर्सपर्यंत पोहोचते. सायबर सुरक्षा कंपनी कॅस्पर्सकी (cybersecurity company Kaspersky) चे डायरेक्टर दिमित्री बेस्टुजेव (Dmitry Bestuzhev) यांनी सांगितलं, की WhatsApp मध्ये सुरक्षेबाबत अनेक त्रुटी आहेत. WhatsApp वर युजर्सने आपली कोणत्याही प्रकारची पर्सनल माहिती शेअर करू नये.

हे वाचा -  UPI Payment करता?UPI PINद्वारे होणाऱ्या फ्रॉडपासून करा बचाव, NPCI ने केलं अलर्ट

www.express.co.uk मध्ये प्रकाशित एका माहितीनुसार, दिमित्री बेस्टुजेवने स्पॅनिश न्यूज एजेन्सीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं, की WhatsApp सुरक्षित प्लॅटफॉर्म नाही. फ्रॉडस्टर्स WhatsApp युजर्सच्या डेटावर नजर ठेवून असतात आणि मोठी संधी मिळतात त्याचा गैरवापर केला जातो.

हे वाचा -  कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे तुमचं Aadhaar Card, घरबसल्या असं तपासा

WhatsApp पासून इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खासगी माहिती शेअर करू नका. सायबर सिक्योरिटी एजेन्सीच्या प्रमुखाने दिलेल्या माहितीनुसार, फ्रॉडस्टर्ससाठी WhatsApp नवं नाही, जगभरातील मेसेजिंग सेवेच्या सुमारे 200 कोटी वापरकर्त्यांना लक्ष्य करणं हे फ्रॉडस्टर्सचं टार्गेट आहे. त्यामुळे WhatsApp वर कोणतीही माहिती शेअर करू नका. कोणतीही अनोळखी लिंक ओपन करू नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या