JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / लवकरच बदलणार WhatsAppचं रुप, नव्या वर्षात होणार 5 मोठे बदल

लवकरच बदलणार WhatsAppचं रुप, नव्या वर्षात होणार 5 मोठे बदल

नव्या वर्षात whatsappमध्ये कोणते बदल होणार आहेत जाणून घ्या सविस्तर.

जाहिरात

तुम्ही WhatsApp वर काही महत्त्वाच्या कॉन्टॅक्टसाठी रिंगटोन सेट करु शकता. जेव्हा त्या नंबरवर एखादा मेसेज येईल त्यावेळी तुम्हाला लगेच समजेल. जाणून घ्या कसं करायचं सेटिंग...

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 जानेवारी: व्हॉट्सअॅप (Whatsapp)सध्या नवनवे अपडेट घेऊन येत आहे. यातच आता युझरच्या फायद्यासाठी आणखी एक नवा अपडेट आणला आहे. 2019मध्ये व्हॉट्सअॅपने ग्रुप व्हॉइस कॉल्स(voice call), फ्रिक्वेंटली फॉरवर्डेड (frequently forwarded), फिंगरप्रिंट लॉक (fingerprint lock)सारख्या सेवा ग्राहकांना दिल्या होत्या. नव्या वर्षात व्हॉट्सअॅप आता आणखी काही बदल ग्राहकांसाठी घेऊन येणार आहे. हे फीचर्स चॅटिंगशी निगडित असणार आहे अशी माहिती मिळत आहे. 2020 या वर्षात आता चॅट विंडोसह 4 मोठे बदल होणार आहेत. याचा फायदा ग्राहकांना होणार असून अधिक चांगली सेवा देण्यावर भर दिला आहे. हे फीचर्स कोणते असणार आहेत जाणून घ्या सविस्तर. Dark Mode: whatsapp मध्ये डार्क मोड लवकरच येणार असल्याचं सांगितलं जात आहे. अॅड्रॉइड आणि iOSसाठी लवकरच डार्क मोड फीचर आणले जाणार आहे. दरम्यान अद्याप या सगळ्या अपडेटसाठी रिलीज डेट देण्यात आली नाही. तरी, येत्या काही दिवसांत हे बदल दिसू लागतील. याआधी व्हॉट्सअॅपनं ग्रुप इनवाइट सारखे फिटक आणले होते. WABetaInfoने यासंदर्भातील एक फोटोही शेअर केला आहे.

Dark Theme: whatsappमध्ये डार्क मोड लवकरच येणार असल्याच्या माहितीसोबतच डार्क थीमही आणली जाणार आहे. व्हॉट्सअॅपमध्ये Default Dark Wallpaper आणण्याबाबतही कंपनीकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे. हेही वाचा- jioची नवीन वर्षात खास भेट, 98 ते 2020 रुपयांपर्यंत बेस्ट प्लान Disappering Message: whatsappकडून बीटा वर्जनमध्ये नुकतच एक फीचर देण्यात आलं आहे. WABetaInfo कंपनीने दिलेल्या माहितीनुसार Delete Message फीचरवर सध्या पुन्हा काम सुरू आहे. डिलिट मेसेजसाठी वेगळा पर्याय य़ेणार आहे. या फीचरवर सध्या काम सुरू असून whatsappच्या 2.19.348 बीटा वर्जनमध्ये सध्या याचं टेस्टिंग सुरू आहे.

Multiple Device: सध्या whatsappकडून महत्त्वाच्या फीचरवर काम सुरू आहे. य़ा फीचरमुळे एकाच नंबरवरून तुम्ही अनेक डिवाइसवर एकाचवेळी whatsapp सेवा वापरू शकणार आहात. WABetaInfo कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हे फीचर सुरक्षित ठेवण्यासाठी अधिक काम करावं लागत आहे. यामुळे कुठल्याही युझर्सची प्रायवसी धोक्यात येणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी end-to-end encrypted सारखा पर्याय देण्यात आला आहे. हे फीचर्स फक्त iOSच्या बीटा वर्जनसाठी असणार आहे. Face Unlock: व्हॉट्सअॅपने 2019मध्ये युझर्सच्या सिक्युरिटीसाठी whatsapp चॅटला Fingerprint lock ची सेवा दिली आहे. आता युझर्सना दोन पर्याय मिळणार आहेत. फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट. व्हॉट्सअॅपच्या म्हणण्यानुसार फेस अनलॉक अधिक सिक्युअर असेल असही सांगण्यात येत आहे. त्यामुळे या नव्या वर्षात युझर्ससाठी whatsapp face unlockचं फीचर आणणार आहे. हेही वाचा- कार घेताय? तर Hyundai Aura करा फक्त 10,000 मध्ये बूक! हेही वाचा- Android फोन्समध्ये Apple सारखी सुविधा; या कंपन्यांचे नवे फीचर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या