JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp Chat आता आणखी सुरक्षित होणार; पाहा तुमच्यावर कसा परिणाम होणार

WhatsApp Chat आता आणखी सुरक्षित होणार; पाहा तुमच्यावर कसा परिणाम होणार

WhatsApp Chat लीक कसे होतात? यामगे क्लाउड बॅकअप हे मोठं कारण आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅट एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतात, परंतु बॅकअप एन्क्रिप्टेड नसतो. आता युजर्सच्या सेफ्टी डेटासाठी व्हॉट्सअ‍ॅप एक नवं फीचर आणणार आहे.

जाहिरात

आता पुन्हा कॉल करा आणि व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करण्यासाठी पुन्हा हीच प्रोसेस वापरा. WhatsApp आपल्या अ‍ॅपमध्ये कॉल रेकॉर्डिंगचं कोणतंही फीचर देत नाही. हे थर्ड पार्टी अ‍ॅप युजर्स आपल्या रिस्कवर डाउनलोड करू शकतात.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 जुलै: व्हॉट्सअ‍ॅपकडून (WhatsApp) आपल्या युजर्ससाठी विविध फीचर्स लाँच केले जातात. व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवण्यात आलेले मेसेज एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतात. म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅपवर तुमच्याकडून पाठवण्यात आलेला मेसेज केवळ रिसिव्ह करणाराच वाचू शकतो. इतर तिसरा व्यक्ती दोघांमधलं चॅट पाहू शकत नाही. व्हॉट्सअ‍ॅपही हे तुमचे मेसेज वाचू शकत नाही. परंतु तरीही WhatsApp Chat लीक कसे होतात? यामगे क्लाउड बॅकअप हे मोठं कारण आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅट एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतात, परंतु बॅकअप एन्क्रिप्टेड नसतो. आता युजर्सच्या सेफ्टी डेटासाठी व्हॉट्सअ‍ॅप एक नवं फीचर आणणार आहे. आतापर्यंत केवळ व्हॉट्सअ‍ॅपचे पर्सनल चॅट एन्क्रिप्टेड होत होते. पण बॅकअप एन्क्रिप्टेड करता येत नव्हता. बॅकअप एन्क्रिप्टेड नसल्याने, हॅकर्स किंवा सरकारी एजेन्सी युजर्सचं चॅट गुगल, अ‍ॅपल किंवा इतर कोणत्याही क्लाउड स्टोरेजमधून मिळवू शकत होते. हाय सिक्योरिटी असूनही कसे लीक होतात WhatsApp Chat, वाचा काय आहे कारण परंतु आता Wabetainfo ने दिलेल्या माहितीनुसार, WhatsApp आता बॅकअप देखील एन्क्रिप्टेड करण्याच्या फीचरवर काम करत आहे. कंपनीने याचं टेस्टिंग सुरू केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉईडसाठी बीटा वर्जन 2.21.15.5 मध्ये या नव्या फीचरचं टेस्टिंग सुरू आहे. Pegasus Spyware चा धोका; कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, WhatsApp हॅकची शक्यता या फीचरअंतर्गत युजर्सला आपलं चॅट रिस्टोर करण्यासाठी पासवर्ड किंवा 64 डिजीट एन्क्रिप्शन Key ची गरज असेल. हा पासवर्ड व्हॉट्सअ‍ॅप, गुगल किंवा अ‍ॅपलसह शेअर केला जाणार नाही. चॅट ज्यावेळी रिस्टोर केलं जाईल, त्यावेळी हा पासवर्ड किंवा Encryption Key ची गरज असेल, त्याशिवाय चॅट रिस्टोर करता येणार नाही. त्यामुळे नव्या फीचरमुळे चॅट बॅकअप कोणीही अ‍ॅक्सेस करू शकणार नाही. त्यामुळे आता युजर्सच्या व्हॉट्सअ‍ॅप पर्सनल चॅट, मेसेजेसह, व्हॉट्सअ‍ॅप बॅकअपही सुरक्षित होईल. हे फीचर कधीपर्यंत लाँच केलं जाईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या