JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / तुमच्या कामाचं WhatsApp चं नवं अपडेट; Last Seen, फोटो, स्टेटसबाबत महत्त्वाचं फीचर

तुमच्या कामाचं WhatsApp चं नवं अपडेट; Last Seen, फोटो, स्टेटसबाबत महत्त्वाचं फीचर

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आपली प्रायव्हसी सेटिंग (Privacy Setting) अपडेट करण्यावर काम करत आहे.

जाहिरात

होम स्क्रिनवर लाँग प्रेस करुन याला एक्सपँड करता येतं. आता WhatsApp ओपन न करताच मेसेज वाचता येईल.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आपली प्रायव्हसी सेटिंग (Privacy Setting) अपडेट करण्यावर काम करत आहे. ज्यात युजर्स कॉन्टॅक्टमधूनच आपल्या लास्ट सीन, प्रोफाईल फोटो आणि स्टेटस अपडेट लपवू शकतील. हे फीचर अशा युजरसाठी महत्त्वाचं ठरतं ज्यांना त्यांचा फोटो, स्टेटस आणि लास्ट सीन काही लोकांना सोडून इतरांना सर्वांना दिसाव असं वाटतं. सध्या युजरला तीन पर्याय मिळतात. Everyone, My Contacts किंवा Nobody सिलेक्ट करण्याचा पर्याय मिळतो. WABetaInfo कडून मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप आपली प्रायव्हसी अपडेट करण्याचं काम करत आहे. हे अपडेट अँड्रॉईड आणि iOS दोघांसाठी असेल. या अपडेटमध्ये ‘My Contact Except….’ हा पर्याय मिळेल, जो आधी केवळ Everyone, my contacts आणि Nobody असा होता.

WhatsApp युजर्ससाठी धोक्याचा इशारा, अधिक फीचरच्या नादात वाढतील समस्या

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, युजर दुसऱ्या कॉन्टॅक्टसाठी आपलं लास्ट सीन लपवत असेल, तर युजरला त्या कॉन्टॅक्टचंही लास्ट सीन पाहता येणार नाही. अशाचप्रकारे स्टेटससाठीही ज्या कॉन्टॅक्टला युजरने डिसेबल केलं आहे, तुम्हीही त्याचं अ‍ॅक्टिव्ह स्टेटस पाहू शकणार नाही.

WhatsAppवर चुकून दुसऱ्याला सेंड झाला मेसेज?टाईम लिमिट संपल्यानंतर असा करा डिलीट

2017 मध्ये WhatsApp ने My Contact Except.. हा पर्याय स्टेटससाठी प्रायव्हसी सेटिंगमध्ये लाँच केला होता. Photo: WABetaInfo. दरम्यान, WhatsApp वर लवकरच इन्स्टाग्रामसारखे मेसेज रिअ‍ॅक्शन फीचर (Message Reaction Feature) मिळणार आहे. WABetaInfo च्या म्हणण्यानुसार, कंपनी अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हींसाठी या फीचरवर काम करत आहे. या फीचरद्वारे युझर्स मेसेजवर रिअ‍ॅक्शन इमोजीद्वारे आपल्या प्रतिक्रिया देऊ शकतील. मेसेजच्या खाली इमोजींची यादी दिसेल. ही सुविधा ग्रुप चॅट आणि पर्सनल चॅट दोन्हीसाठी मिळणार आहे. मात्र यासाठी व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करणं आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या