JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp पाठोपाठ Facebook ला मोठा धक्का, इंडिया हेड आणि डायरेक्टरचा कंपनीला रामराम

WhatsApp पाठोपाठ Facebook ला मोठा धक्का, इंडिया हेड आणि डायरेक्टरचा कंपनीला रामराम

व्हॉट्सअ‍ॅप इंडियाचे प्रमुख अभिजित बोस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर, फेसबुकचे पब्लिक पॉलिसी डायरेक्टर राजीव अग्रवाल यांनीही कंपनी सोडली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 नोव्हेंबर :  अमेरिकी उद्योगपती एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर हजारो लोकांना कामावरून कमी करण्यात आलं. त्यानंतर फेसबुकनेही असाच निर्णय घेत हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे. दरम्यान, आता व्हॉट्सअ‍ॅप इंडियाचे प्रमुख अभिजित बोस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर, फेसबुकचे पब्लिक पॉलिसी डायरेक्टर राजीव अग्रवाल यांनीही कंपनी सोडली आहे. बोस यांना पहिल्यांदाच कोणत्याही देशासाठी व्हॉट्सअ‍ॅपचे प्रमुख बनवण्यात आलं होतं. 2018 मध्ये त्यांना हे पद देण्यात आलं होतं. त्यांना भारतात मेसेजिंग अ‍ॅप जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्सचा व्यवसाय हाताळण्याचं काम देण्यात आलं होतं. या पूर्वी, बोस पेमेंट कंपनी Ezetapचे सह-संस्थापक होते. Razer Pay ने या वर्षाच्या सुरुवातीला Ezetap विकत घेतली होती. या संदर्भात ‘टीव्ही 9 हिंदी’ने वृत्त दिलंय. फेसबुकची पेरेंट कंपनी मेटा इंडियाने या दोघांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसंच याचा कर्मचारी कमी करण्याच्या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. अलीकडेच मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी कंपनीतून तब्बल 11,000 लोकांना कमी करण्याचा प्लॅन करण्याचा विचार असून, त्यामुळे कंपनीच्या वर्कफोर्समध्ये 13 टक्के घट होईल, असं सांगितलं होतं. ट्विटर, इन्स्टानंतर आता मेटाचा दणका! तब्बल 11,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना एका क्षणात काढलं व्हॉट्सअ‍ॅपचे पब्लिक पॉलिसी डायरेक्टर शिवनाथ ठुकराल यांची आता मेटाने पब्लिक पॉलिसीचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीने सांगितलं की, ठुकराल यांची कंपनीच्या तिन्ही प्लॅटफॉर्म - व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या पब्लिक पॉलिसी हेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठुकराल यांना अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली असली तरी बोस यांची जागा कोण घेणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. व्हॉट्सअ‍ॅपचे प्रमुख विल कॅथकार्ट म्हणाले की, ‘भारतातील व्हॉट्सअ‍ॅपचे पहिले प्रमुख म्हणून अभिजित बोस यांच्या योगदानाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसंच ठुकराल यांचे उद्योजकीय कौशल्य टीमला नवीन सेवा देण्यास मदत करेल, ज्यामुळे कोट्यवधी लोकांना आणि व्यवसायांना फायदा होईल. भारतासाठी व्हॉट्सअ‍ॅप बरंच काही करू शकतं आणि भारताच्या डिजिटल परिवर्तनास पुढे नेण्यास ते उत्सुक असल्याचंही सांगितलं’. मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करणाऱ्या मस्क, झुकरबर्ग यांनी भारतीय उद्योगपतींकडून या गोष्टी शिकाव्यात! या महिन्याच्या सुरुवातीला मेटा इंडियाचे उपाध्यक्ष अजित मोहन यांनी राजीनामा दिला होता. मोहन आशिया पॅसिफिक प्रदेशातील व्यवसाय प्रमुख म्हणून प्रतिस्पर्धी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्नॅपमध्ये रुजू झाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या