नवी दिल्ली, 2 मे: इंटरनेटच्या या जगात ऑनलाईन फसवणूक - फ्रॉडची प्रकरणं आणि सायबर क्राईममध्ये मोठी वाढ झाली आहे. फ्रॉडस्टर्स अशा अनेक ऑनलाईन पद्धतींचा वापर करतात, ज्यामुळे युजर्सची मोठी फसवणूक होऊ शकते. असाच एक प्रकार समोर आला आहे, ज्यात फ्रॉड करणारा व्यक्ती, डिलीव्हरी ट्रॅक करणारा एक मेसेज पाठवतो आणि जर युजरने त्या लिंकवर क्लिक केलं, तर बँक अकाउंट खाली होऊ शकतं. असा होतो फ्रॉड - ब्रिटनमध्ये हे प्रकरण समोर आलं आहे, ज्यात फ्लोबॉट (FluBot) नावाचा एक मेसेज शेअर होत आहे. या मेसेजमध्ये डिलीव्हरी ट्रॅक करण्याबाबत माहिती दिली जाते. या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवरुन एक अॅप डाउनलोड करण्यासाठी सांगितलं जातं. युजरने हे अॅप डाउनलोड केल्यानंतर हे अॅप युजरचा पर्सनल डेटा, पासवर्ड, बॅकिंग डिटेल्स आणि कॉन्टॅक्सची चोरी करतं.
हे अॅप पूर्णपणे फेक अॅप आहे, जे फ्रॉड करणाऱ्या लोकांद्वारे वापरलं जात आहे. या अॅपचा वापर करुन सायबर चोर युजर्सचा पैसा चोरी करत असल्याचं समोर आलं आहे. फ्रॉडपासून वाचण्यासाठी काय कराल - अशा प्रकारच्या फ्रॉडपासून वाचण्यासाठी UK नॅशनल सायबर सिक्योरिटी सेंटरने (NCSC) या फेक अॅपची ओळख होण्यासाठी सिक्योरिटी गायडन्स जारी केलं आहे. या फ्रॉडपासून वाचण्यासाठी लोकांना सतर्क राहण्याचं सांगण्यात आलं आहे. वोडाफोनसारख्या नेटवर्क प्रोव्हाडर कंपनीनेही या फ्रॉडपासून सावध राहण्याचं सांगितलं आहे.
ज्या युजर्सनी हे अॅप डाउनलोड केलं आहे, त्यांनी आपल्या फोनमधून अॅप त्वरित डिलीट करण्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे पर्सनल माहिती फ्रॉडस्टर्सकडे जाण्यापासून वाचेल आणि मोठं नुकसान टळू शकेल.