नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : इन्स्टंट मेसेजिंग App WhatsApp आपल्या एका निर्णयामुळे चर्चेत आहे. WhatsApp ने 22 लाखहून अधिक WhatsApp Accounts बॅन केले आहेत. कंपनीच्या मासिक रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा झाला आहे. WhatsApp Accounts बॅन करण्यामागे युजर्सने नियम तोडल्याचं कारण देण्यात आलं आहे. WhatsApp ने युजर्सच्या सुरक्षेच्यादृष्टीने अशा युजर्सला बॅन केलं, ज्यांनी नियमांचं उल्लंघन केलं होतं. WhatsApp च्या युजर सेफ्टी रिपोर्टनुसार, एकूण बॅन संख्या 22 लाख 9 हजार इतकी आहे. इतर युजर्सकडून आलेल्या तक्रारी आणि त्यावर केलेल्या कारवाईसह या प्लॅटफॉर्मचा दुरोपयोग रोखण्यासआठी WhatsApp ने ही कारवाई केल्याचं सांगितलं आहे.
WhatsApp ने सरकारला दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये त्यांना अकाउंट सपोर्ट, बॅन अपील, इतर सपोर्ट आणि सेफ्टी कॅटेगरीमध्ये 560 युजर जनरेटेड तक्रारी आल्या होत्या. ऑगस्टदरम्यान अकाउंट्स सपोर्ट (105), बॅन अपील (222), इतर सपोर्ट (34), प्रोडक्ट सपोर्ट (42) आणि सेफ्टी (17) मध्ये 420 यूजर रिपोर्ट मिळाले होते. End-to-end encryption पॉलिसीमुळे युजर्सचे मेसेज पाहता येत नाहीत. अशात युजर्सची सुरक्षा लक्षात घेता अकाउंट्सकडून मिळणारे संकेत, एन्क्रिप्शनशिवाय काम करणारे फीचर्स आणि युजर्सकडून करण्यात आलेले रिपोर्ट्स या आधारावर निर्णय घेतला जातो. नव्या आयटी नियमांनुसार, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला दर महिन्याला कंप्लायन्स रिपोर्ट द्यावा लागतो.
या गोष्टी करू नका - कोणी बेकायदेशीर, अश्लील, बदनामी करणारे, धमकी देणारे, त्रास देणारे, द्वेषपूर्ण भाषणं, वांशिक भेदभाव शेअर करत असेल, किंवा कोणत्याही बेकायदेशीर, अनुचित प्रथेला प्रोत्साहन देत असेल तर असे अकाउंट्स बॅन करण्यात येतील. त्याशिवाय WhatsApp च्या नियमांचं उल्लंघन केलं तरीही अकाउंट बॅन होऊ शकेल. त्यामुळे असा कोणताही कंटेट शेअर करू नका आणि तुमचं अकाउंट सुरक्षित ठेवा.