JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / कुकीज आणि कॅशे म्हणजे काय रे भाऊ! त्यांच्यामुळं आपला कंप्यूटर का हँग होतो?

कुकीज आणि कॅशे म्हणजे काय रे भाऊ! त्यांच्यामुळं आपला कंप्यूटर का हँग होतो?

ब्राउझरचे कॅशे, कुकीज आणि हिस्ट्री नियमितपणे डिलीट केल्यानं तुमच्या कंप्युटरमधील स्पेस रिकामी होते आणि सिस्टमचा परफॉर्मन्स वाढतो.

जाहिरात

कुकीज आणि कॅशे म्हणजे काय रे भाऊ! त्यांच्यामुळं आपला कंप्यूटर का हँग होतो?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 ऑक्टोबर: तुमच्या ब्राउझरमध्ये तुमच्याबद्दल बरीच माहिती साठवलेली असते. यामध्ये तुम्ही विजिट केलेल्या वेबसाइट्स, तुमचे पासवर्ड, ब्राउझिंग हिस्ट्री, तुम्ही डाउनलोड केलेला डेटा आणि बरेच काही साठवलेलं असतं. हा डेटा तुमच्या PC वर जमा होत राहतो आणि तुमचा संगणक स्लो होऊ लागतो. त्यामुळे तुमच्या ब्राउझरची कॅशे, कुकीज आणि हिस्ट्री नियमितपणे साफ करणं गरजेचं आहे. असं केल्यानं तुमच्या संगणकामधील स्पेस मोकळी होते. त्यामुळं त्यातील वैयक्तिक माहितीचं संरक्षण होतं आणि संगणकाचा परफॉर्मन्सही सुधारतो. कंप्युटरमधून कॅशे, कुकीज हटवण्याची प्रोसेस जाऊन घेण्यापूर्वी ते काय आहेत आणि त्यांचं कार्य काय आहे ते जाणून घेऊया. जेव्हा तुम्ही कोणत्याही वेबसाइटवर जाता तेव्हा तुम्हाला अनेकदा एक पॉप दिसतो जो तुमच्याकडून परवानगी मागतो, या कुकीज असतात. कुकीज म्हणजे तुम्ही भेट दिलेल्या वेबसाइटद्वारे तयार झालेल्या फाइल्स. जेव्हा तुम्ही ब्राउझरवर काहीतरी शोधता किंवा त्या साइटला पुन्हा भेट देता तेव्हा ते तुमचा अनुभव अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी तुमची ब्राउझिंग माहिती ट्रॅक करतात. कॅशे आणि हिस्ट्री- जेव्हा तुम्ही वेबसाइटला भेट देता, तेव्हा कॅशे त्यातील काही भाग लक्षात ठेवतो, जसे की फोटोज किंवा अन्य् माहिती लक्षात ठेवली जात. जेणेकरून पुढील भेटीदरम्यान तुमच्या पसंतीचे वेबपृष्ठ अधिक वेगानं उघडू शकेल. तुमची हिस्ट्री ही तुम्ही भूतकाळात भेट दिलेल्या वेबसाइटची लिस्ट असते. तुमची हिस्ट्री साफ करून तुम्ही वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवू शकता. गुगल क्रोम वर कसे हटवायचे? तुमच्या PC वर Chrome उघडा आणि वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. More tools’ आणि ‘clear browsing Data’ निवडा. नंतर ब्राउझिंग हिस्ट्री, डाउनलोड हिस्ट्री, कुकीज, इतर साइट डेटा आणि कॅशे निवडा. त्यानंतर क्लिअर डेटावर क्लिक करा. हेही वाचा:  तुमचं व्हॉट्सअ‍ॅप चॅट दुसरं कुणीतरी वाचतंय कां? फक्त 3 क्लिकमध्ये मिळणार माहिती  iOS सफारी- आपण सफारी वापरत असल्यास शीर्ष मेनूवर जा आणि हिस्ट्री निवडा आणि हिस्ट्री साफ करा. आता तुम्हाला ज्या टाइम फ्रेमसाठी डेटा साफ करायचा आहे ती निवडा आणि Clear History वर क्लिक करा. तुमचा ब्राउझिंग हिस्ट्री आणि कॅशे काढून टाकले जातील. mozilla firefox- वरच्या उजव्या कोपर्यात हॅम्बर्गर मेनूवर क्लिक करा. त्यानंतर डाव्या पॅनलमधून प्रायव्हसी आणि सिक्युरिटी पर्याय निवडा. कुकीज आणि साइट डेटावर खाली स्क्रोल करा. फायरफॉक्स बंद झाल्यावर कुकीज आणि साइट डेटा साफ करा असे म्हणत असलेल्या बॉक्सवर क्लिक करा. त्यानंतर क्लिअर डेटावर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या