आधारबाबत अलर्ट राहणं गरजेचं आहे. आधार कार्ड वेरिफाय करणं आवश्यक आहे. ऑफलाईन वेरिफिकेशनसाठी तुम्ही आधार किंवा आधार लेटर किंवा PVC कार्डवर असलेला क्यूआर कोड मोबाईल फोनवरुन स्कॅन करुन त्यावर माहिती योग्य आहे की नाही ते तपासू शकता. ऑनलाईन वेरिफिकेशनसाठी www.uidai.gov.in वेबसाईटवर जावं लागेल. वेबसाईटवर 12 अंकी आधार नंबर टाकावा लागेल. त्याशिवाय mAadhaar App वरही वेरिफिकेशन करू शकता.
नवी दिल्ली, 4 जुलै : देशात बँकिंगपासून रेशन कार्ड बनवण्यापर्यंतच्या कामांसाठी आधार कार्डची (Aadhaar Card) गरज असते. आधार कार्डशिवाय कोणतंही काम होत नाही. अशात आधार अपडेट करणं, आधार कार्ड हरवणं किंवा आधारसाठी अप्लाय करणं यासाठी आधार केंद्रात जावं लागतं. परंतु आता आधार कार्डमध्ये माहिती अपडेट करणं सोपं होणार आहे. UIDAI टोल फ्री हेल्पलाईन नंबर - आधारसंबंधी कोणत्याही समस्येसाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबर 1947 वर ग्राहक कॉल करू शकतात. UIDAI ने ग्राहकांसाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबर दिला आहे. ही स्पेशल सर्विस ग्राहकांना 12 भाषांमध्ये मदत करेल. हिंदी, इंग्रजी, तेलुगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, मराठी, उडिया, उर्दु, आसामी, बंगाली या भाषांमध्ये हेल्पलाईन सपोर्ट मिळेल. Email द्वारेही तक्रार - ग्राहक मेलद्वारेही तक्रार दाखल करू शकतात. यासाठी help@uidai.gov.in वर ग्राहक आपली समस्या पाठवू शकतात. UIDAI चे अधिकारी वेळोवेळी मेल चेक करतात आणि ग्राहकांच्या समस्यांचं निराकरण करतात. तक्रार सेल ई-मेलवर उत्तर देऊन समस्यांचं समाधान करतात.
आधार ऑनलाईन अपडेट - ऑनलाईन आधारमध्ये नाव, जन्मतिथी, लिंग, पत्ता आणि भाषा सेल्फ सर्विस अपडेट पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन आधार अपडेट अर्जासाठी रजिस्टर्ड मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आधार ऑथेंटिंकेशनसाठी OTP येईल. यात कुटुंब प्रमुख, पालकांची माहिती, बायोमेट्रिकसारख्या इतर अपडेटसाठी आधार सेवा केंद्रात भेट द्यावी लागेल. यासाठी 50 रुपये फी द्यावी लागेल.
वेबसाईटवर करा तक्रार - UIDAI च्या वेबसाईटवरही आधारसंबंधी तक्रार दाखल करता येऊ शकते. - UIDAI च्या https://resident.uidai.gov.in/ च्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. - इथे संपर्कासाठी Ask Aadhaar वर जावं लागेल. - इथे ग्राहकाला आधार Executive शी लिंक केलं जाईल. इथे ग्राहक आपली समस्या सांगून मदत मिळवू शकतात.