JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / परीक्षेची तयारी होईल सोपी, टॉपर लर्निंग एक्झाम प्रेप एप ठरेल फायद्याचं

परीक्षेची तयारी होईल सोपी, टॉपर लर्निंग एक्झाम प्रेप एप ठरेल फायद्याचं

Topper Learning Exam Prep App : एक लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी डाऊनलोड केलेलं हे अॅप विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी आणि चांगल्या गुणांसह उत्तीर्ण होण्यासाठीचं एक चांगलं व्यासपीठ आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 डिसेंबर : सीबीएसई आणि आयसीएसई परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Topper Learningचे Exam Prep App अभ्यासासाठी फायद्याचं ठरत आहे. एक लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी डाऊनलोड केलेलं हे अॅप विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी आणि चांगल्या गुणांसह उत्तीर्ण होण्यासाठीचं एक चांगलं व्यासपीठ आहे. जाणून घेऊया टॉपर लर्निंगचं एक्झाम प्रेप अॅप का निवडायचं? एक्झाम प्रेप अॅप हे नव्या शिक्षण साधनांचे केंद्र आहे. अभ्यासासाठी प्रश्नांचे संच इथे उपलब्ध असून आपल्या ज्ञानाची तात्काळ चाचणी घेता येते. शाळेतल्या क्लासरूमनंतर हे अॅप तुमचा असा मित्र आहे ज्याच्याकडे सर्वात कठीण अशा प्रश्नांची उत्तरे मिळतात. इतकंच नाही तर काही मिनिटात सर्व शंकांचे समाधान होते. हेही वाचा :  इन्स्टाग्रामवरच्या डिलिटेड पोस्ट्सही करता येतात रिकव्हर, फॉलो करा सोप्या स्टेप्स विज्ञान (भौतिक, रसायन शास्त्र, जीवशास्त्र, गणित, सामाजिक शास्त्र (इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिक शास्त्र), इंग्रजी व्याकरण, हिंदी व्याकरण यासह कोणत्याही विषयातील ऑनलाइन परीक्षे देऊन तुमच्या मनातील परीक्षेची भीती दूर करता येते. तुम्हाला कठीण वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरे यात मिळवू शकता. विषयाच्या नोट्स, संशोधन नोट्स, सोडवलेली नमुना उत्तरे आणि आधीच्या वर्षातील प्रश्नपत्रिका, विषयानुसार परीक्षेची तयारी जोपर्यंत करायची आहे तोपर्यंत अभ्यास करता येतो. शालेय विद्यार्थ्यांचा विचार करून हे अॅप अत्यंत काळजीपूर्वक तयार करण्यात आला आहे. तुम्हा तुमचे प्रगतीपुस्तकही मिळेल आणि ज्या प्रश्नांबद्दल तुमच्या मनात संभर्म आहे त्यांची उत्तरेही तात्काळ यामध्ये मिळतील. बोर्डाच्या परीक्षेची तयारी यामुळे तुलनेने सोपी होऊन जाते. नवीन रणनिती, एक शेड्युल, चांगल्या पद्धतीने तयार केलेली पुर्नपरिक्षण साहित्य आणि नियमीत अभ्यास यांचे काटेकोर नियोजन आणि पालन केल्यास हे शक्य होते. Topper Learning Exam Prep हे फ्री अॅप असून विद्यार्थ्यांना यातून परीक्षेची तयारी करताना मदत होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या