JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / लॉकडाउन काळात सिम कार्ड Prepaid टू Postpaid करायचं? आता एका OTP ने होईल काम, गाइडलाइन्स जारी

लॉकडाउन काळात सिम कार्ड Prepaid टू Postpaid करायचं? आता एका OTP ने होईल काम, गाइडलाइन्स जारी

प्रीपेड टू पोस्टपेड करण्यासाठी ट्रायने (TRAI) नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. नव्या नियमांनुसार, हे काम अगदी काही वेळातच करता येणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 मे : कोरोनामुळे अनेक राज्यात, शहरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. अशा काळात जर मोबाईल सिम कार्ड प्रीपेड (Prepaid) टू पोस्टपेड (Postpaid) करायचं असल्यास, आता केवळ एका क्लिकवर हे काम घरबसल्या करता येणार आहे. प्रीपेड टू पोस्टपेड करण्यासाठी ट्रायने (TRAI) नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. नव्या नियमांनुसार, हे काम अगदी काही वेळातच करता येणार आहे. एका OTP च्या मदतीने तुम्ही हे बदल करू शकता. त्याशिवाय Prepaid To Postpaid करताना मोबाईल सर्विस 30 मिनिटांपेक्षा अधिक काळ बंद राहणार नाही. SMS द्वारे पाठवा रिक्वेस्ट - Prepaid To Postpaid कन्वर्ट करण्यासाठी युजरला सध्याच्या कनेक्शनवरुन SMS, IVRS, वेबसाईट किंवा अधिकृत App वरुन Request पाठवावी लागेल.

(वाचा -  Airtel CEO चा इशारा, चुकूनही हे App डाउनलोड करू नका, अन्यथा… )

रिक्वेस्ट मिळाल्यानंतर मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल. तुम्ही प्रीपेड ते पोस्टपेड करण्यासाठी विनंती केल्याचं त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असेल. मेसेजमध्ये एक यूनिक ट्रान्झेक्शन आयडीही असेल, त्याशिवाय एक OTP ही येईल. मेसेज आल्यानंतर 10 मिनिटांत OTP एक्सपायर होईल.

(वाचा -  Oximeter शिवायच चेक करा ऑक्सिजन लेवल; मोबाईलनेच चेक करता येणार Oxygen Level )

OTP वरुन Validity नंतर SIM Prepaid ते Postpaid मध्ये कन्वर्ट होईल. युजरला कन्व्हर्जनची तारीख आणि वेळ याबाबत माहिती दिली जाईल, त्यानंतर काही वेळातच वेळ आणि तारखेनुसार कनेक्शन प्रीपेड टू पोस्टपेड होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या