JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / देवा! आता Sim Card खरेदीचे नियमही बदलणार? ‘ही’ कागदपत्रे असतील आवश्यक

देवा! आता Sim Card खरेदीचे नियमही बदलणार? ‘ही’ कागदपत्रे असतील आवश्यक

Sim Card Rules: मोबाईल सिम कार्ड खरेदीशी संबंधित नियमांमध्ये बदल होऊ शकतो. केंद्र सरकार या प्रस्तावावर विचार करत असून लवकरच त्याची अंमलबजावणी होईल. अनेक प्रकारची फसवणूक रोखण्यासाठी सरकार सिमकार्ड जारी करण्याचे नियम कडक करणार आहे.

जाहिरात

देवा! आता Sim Card खरेदीचे नियमही बदलणार? ‘ही’ कागदपत्रे असतील आवश्यक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 नोव्हेंबर: मोबाईल ही आता काळाची गरज बनली आहे. मोबाईल चालण्यासाठी सिमकार्डची गरज असते. सिमकार्ड खरेदी करण्यासाठी सरकारनं काही नियम घालून दिले आहेत. परंतु सुरक्षितता आणि फसवणूकीच्या घटना लक्षात घेता सरकारनं आता सिमकार्ड खरेदीचे नियम बदलले आहेत. आता सिमकार्ड खरेदी करणं पूर्वीप्रमाणं सोपं नसणार आहे.  तुम्हाला नवीन सिम कार्ड मिळणं पूर्वीपेक्षा कठीण होणार आहे. सिमकार्डद्वारे होणारी फसवणूक रोखण्यासाठी सरकार आता सिमकार्ड मिळवण्याचे नियम कडक करणार आहे. सध्या कोणताही ग्राहक 21 प्रकारच्या कागदपत्रांपैकी कोणतेही एक दाखवून नवीन सिम कार्ड मिळवू शकतो. मात्र यातून होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकार ही कागदपत्रे 5 पर्यंत कमी करणार आहे. पूर्वी, जिथे सिमकार्ड जारी करण्यासाठी 21 प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता होती, आता ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी 5 दस्तऐवजांपैकी फक्त एक आवश्यक असेल. याबाबतचे नियम केंद्र सरकार येत्या 10 ते 15 दिवसांत जारी करू शकते. हेही वाचा:  वाह! आता WhatsApp ग्रुप होणार चौपट मोठा, एकाच वेळी 32 लोक करू शकणार Video Calling कोणत्या कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड जारी केले जाईल? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता सिमकार्ड फक्त आधार कार्ड, मतदार कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड आणि वीज बिलाच्या आधारावर उपलब्ध होईल. सध्याच्या नियमांनुसार, सध्या शस्त्र परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, रेशन कार्ड, खासदार किंवा आमदार यांचे पत्र, राजपत्रित अधिकारी, पेन्शनर कार्ड, स्वातंत्र्य सैनिक कार्ड, किसान पासबुक, CGHS कार्ड, फोटो यासारख्या कागदपत्रांच्या मदतीने सिम कार्ड मिळवता येत होतं.

बँक खातं उघडणेही सोपे नाही- याशिवाय, नवीन बँक खाते उघडण्यावर सरकार कठोरता वाढवू शकते. सध्या, कोणत्याही बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी, ऑनलाइन ई-केवायसीद्वारे, आधारवरून तपशीलांची पडताळणी केली जाते. पण लवकरच शारीरिक तपासणी देखील आवश्यक असू शकते. केंद्र सरकार याबाबतच्या नियमांमध्ये बदल करण्याच्या विचारात आहे. वास्तविक, गेल्या काही वर्षांपासून बँकांमधील फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अहवालानुसार, 2021-22 मध्ये अशा प्रकरणांमध्ये अडकलेली रक्कम 41,000 कोटी रुपये होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या