ट्रेन आहे की विमान! 'या' हायस्पीड ट्रेनमध्ये लवकर मिळणार प्रवासाची संधी
मुंबई, 7 नोव्हेंबर: भारतीय रेल्वेने सोमवार, 07 नोव्हेंबर 2022 पासून चेन्नई-म्हैसूर वंदे भारत एक्सप्रेसची ट्रायल रन सुरु केली आहे. चेन्नईतील एमजी रामचंद्रन सेंट्रल रेल्वे स्टेशनवरून ही ट्रायल रन सुरु केली आहे. 11 नोव्हेंबर रोजी PM मोदी, चेन्नई-म्हैसूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील, जी भारताच्या दक्षिण भागात स्वदेशी बनावटीची पहिली आणि देशातील पाचवी हाय-स्पीड ट्रेन आहे. पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन 15 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली-कानपूर-अलाहाबाद-वाराणसी मार्गावर सुरु झाली. मेक इन इंडिया मोहिमेला बळकटी देण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वपूर्ण प्रयत्न केले आहेत आणि वंदे भारत एक्सप्रेसचे यश त्यापैकी एक आहे. 15 ऑगस्ट 2021 रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी घोषणा केली होती की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या 75 आठवड्यांदरम्यान 75 वंदे भारत गाड्या देशाच्या कानाकोपऱ्याला जोडतील. वंदे भारत एक्स्प्रेसची खासियत - वेग, सुरक्षितता आणि सेवा ही या ट्रेनची वैशिष्ट्ये आहेत. वंदे भारत एक्स्प्रेस जास्तीत जास्त 160 किमी प्रतितास वेगाने धावू शकते आणि तिला शताब्दी ट्रेनसारखे कोच आहेत परंतु प्रवाशांना चांगला अनुभव मिळतो. वेग आणि सोयीच्या दृष्टीने ही ट्रेन भारतीय रेल्वेसाठी पुढची मोठी झेप आहे. याशिवाय सर्व डब्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले आहेत. एक GPS आधारित ऑडिओ-व्हिज्युअल प्रवासी सूचना प्रणाली, मनोरंजनाच्या उद्देशाने ऑनबोर्ड हॉटस्पॉट वाय-फाय आणि अतिशय आरामदायक आसन व्यवस्थेसह फिरत्या खुर्च्या देखील आहेत. हेही वाचा: Volvo ex90: इलेक्ट्रिक कार आहे की पॉवर बँक, घरालाही पुरवू शकते वीज यासोबतच या ट्रेनच्या सर्व डब्यातील सर्व शौचालये बायो-व्हॅक्यूम प्रकारातील आहेत. एक्झिक्युटिव्ह क्लासच्या प्रवाशांना पुरवल्या जाणार्या साइड रिक्लिनर सीटची सुविधा आता सर्व वर्गांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये 180 डिग्री रेसिप्रोकेटिंग सीटची अतिरिक्त सुविधा आहे. ट्रेनमध्ये बायो-व्हॅक्यूम टॉयलेट्स असून टच फ्री सुविधा आहेत. प्रत्येक कोचमध्ये खाण्यापिण्याच्या सुविधांसह पॅन्ट्री आहे. प्रत्येक वंदे भारत एक्सप्रेसमध्ये एकूण 1,128 प्रवासी बसण्याची क्षमता आहे.
सुरक्षेच्या बाबतीतही वंदे भारत उत्तम - वंदे भारत 2.0 ट्रेनमध्ये कवच (ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टीम) बसवण्यात आले आहे जेणेकरून सुरक्षितता अधिक वाढेल. प्रत्येक कोचमध्ये चार आपत्कालीन खिडक्या जोडल्याने सुरक्षा सुधारेल. पूर्वी असणाऱ्या दोन ऐवजी कोचच्या बाहेरील बाजूस रीअरव्ह्यू कॅमेऱ्यासह चार प्लॅटफॉर्म साइड कॅमेरे बसवण्यात आले आहेत. नवीन कोचमध्ये उत्तम ट्रेन नियंत्रणासाठी लेव्हल-II सेफ्टी इंटिग्रेशन सर्टिफिकेट आहे. वंदे भारत 2.0 मध्ये सर्व इलेक्ट्रिकल रूम आणि टॉयलेटमध्ये एरोसोल आधारित फायर डिटेक्शनसह अग्निसुरक्षा उपाय देखील चांगले असतील. ट्रेनमध्ये वीज बिघाड झाल्यास प्रत्येक डब्यात चार आपत्कालीन प्रकाश व्यवस्था देखील असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली आहे की पुढील तीन वर्षांमध्ये 400 नवीन पिढीच्या वंदे भारत गाड्या विकसित आणि तयार केल्या जातील