BSNL - बीएसएनएल ग्राहक 56700 किंवा 5699 या क्रमांवर मेसेज पाठवू शकतात. कॉलर टोन बंद करण्यासाठी त्यासाठी त्यांना UNSUB मेसेज टाइप करुन तो यापैकी एका नंबरवर पाठवावा लागेल.
नवी दिल्ली, 7 एप्रिल: भारतातील सर्वांत मोठ्या टेलिकम्युनिकेशन (Telecommunications) कंपन्यांपैकी एक आणि सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) विविध सेवा पुरवते. टेलिफोन, मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवांसाठी प्रसिद्ध असलेल्या या कंपनीने त्यांचे 4 प्रीपेड रिचार्ज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हीही बीएसएनएलची सेवा वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. बीएसएनएलने 47 रुपयांचं रिचार्ज कूपन, 109 रुपयांचं प्लॅन व्हाउचर, 998 रुपये आणि 1098 रुपयांचं स्पेशल टेरिफ व्हाउचर असे चार रिचार्ज (Recharge Plans) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तुम्हाला 47 रुपयांचं व्हाउचर वापरता येणार नाही आणि इतर तीन प्लॅनही घेता येणार नाहीत. कंपनीनी हे प्लॅन बंद केल्यामुळे ग्राहकांची गैरसोय होणार आहे. पण कंपनीने ग्राहकांची काळजी घेतली असून जसे हे प्लॅन बंद केले आहेत तसेच काही नवे प्लॅनही (New recharge Plans) कंपनीने लाँच केले आहेत. नव्या प्लॅनमध्ये 197 रुपयांचा प्लॅन आहे. 197 रुपयांच्या रिचार्जमध्ये ग्राहकाला दररोज 2GB डेटा 18 दिवस अमर्याद कॉलची सुविधा मिळणार आहे. या प्लॅनच्या सेवेची मर्यादा 180 दिवसांसाठी आहे.
बीएसएनएलने आपल्या 365 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची किंमत 32 रुपयांनी वाढवून 387 रुपये केली आहे. वार्षिक प्रीपेड प्लॅन (annual prepaid plan) आता 397 रुपयांना उपलब्ध होणार असून या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सर्व सेवा आधी मिळत होत्या तशाच मिळतील. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्याद व्हॉइस कॉल्स, दररोज 100 एसएमएस आणि 60 दिवसांसाठी 2GB डेटा मिळेल. या प्लॅनची एकूण व्हॅलिडिटी 365 दिवस आहे. बीएसएनएलच्या 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर (All networks) अमर्याद व्हॉइस कॉल करता येतात आणि दररोज 1GB डाटा वापरायला मिळतो. तेवढा डाटा संपल्यावर इंटरनेटचा स्पीड 40 kbps होतो. दररोज 100 एसएमएस मिळणार असून तो 60 दिवसांसाठी सुरू राहील.
त्याचबरोबर प्रीपेडमधील 298 रुपयांचा प्लॅनही ग्राहकांना त्याच सर्व सेवा देत आहे, पण ते 56 दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी. त्याचबरोबर या प्लॅनसोबत इरोस नाऊ ओटीटी प्लॅटफॉर्मचं (OTT Platform Subscription) सबस्क्रिप्शनही ग्राहकाला मिळणार आहे. इतर कंपन्यांनीही गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल प्रीपेड, पोस्ट पेड सेवेसोबत ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सबस्क्रिप्शनची ऑफर सुरू केली आहे. त्यामुळेच सरकारी बीएसएनएलच्या ग्राहकांनाही अशी संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या लोकप्रिय 298 च्या प्लॅनसोबत त्यांनी ही ऑफर आणली आहे. म्हणूनच जर तुम्ही बीएसएनएल ग्राहक असाल तर रिचार्ज करण्यापूर्वी ही बातमी एकदा नक्की वाचा.