JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Spyware in Android: तुमचे प्रायव्हेट फोटो लीक तर होत नाहीत ना? असं करा चेक

Spyware in Android: तुमचे प्रायव्हेट फोटो लीक तर होत नाहीत ना? असं करा चेक

Spyware Lookup Tool: स्पायवेअर म्हणजे तुमच्यावर लक्ष ठेवणारे अ‍ॅप. अशा प्रकारच्या अ‍ॅप्सचा वापर आजकाल मोठ्या प्रमाणात होत आहे. नुकतीच एक यादी समोर आली आहे, ज्यामध्ये सर्व देशांतील वापरकर्त्यांचा डेटा समाविष्ट आहे.

जाहिरात

Spyware in Android: तुमचे प्रायव्हेट फोटो लीक तर होत नाहीत ना? असं करा चेक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 ऑगस्ट: स्पायवेअर अ‍ॅप्सबाबत (Spyware Apps in Android) एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. अ‍ॅप्समुळे लाखो अँड्रॉइड यूजर्सचा पर्सनल डेटा लीक होत आहे. अशा अ‍ॅप्सचे बळी जवळपास प्रत्येक देशात सापडले आहेत. विशेषतः अमेरिका, युरोप, ब्राझील, इंडोनेशिया आणि भारतातामध्ये अशा लोकांची संख्या जास्त आहे.  या स्पायवेअरचे स्वरूप असं असतं की, बहुतेक वापरकर्त्यांना त्याची माहितीही नसते. याप्रकरणी टेकक्रंचनं धक्कादायक खुलासा केला आहे. स्पायवेअरचे काम हे आहे की, ते वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनमधून त्यांचा डेटा चोरतात. या डेटामध्ये तुमच्या वैयक्तिक फोटोंसह अनेक खात्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स देखील असू शकतात. टेकक्रंचला या वर्षी जूनमध्ये एक Cache फाइल सापडली होती. ही फाईल TheTruthSpy च्या अंतर्गत नेटवर्कमधून टाकण्यात आली होती. या Cacheमध्ये लीक झालेल्या सर्व Android डिव्हाइसेसची माहिती होती आणि यामध्ये TheTruthSpy नेटवर्कमधील स्पायवेअर होता. नावं अनेक, काम एक- TheTruthSpy नेटवर्कमध्ये Copy9, MxSpy, iSpyoo, SecondClone, TheSpyApp, ExactSpy, GuestSpy आणि FoneTracker स्पायवेअरचा समावेश आहे. या सर्व अॅप्सची नावे भिन्न असू शकतात, परंतु हे सर्व अ‍ॅप्स समान आहेत. या यादीमध्ये स्मार्टफोन्सचे IMEI क्रमांक किंवा त्यांच्या यूनिक एडवरटाईजिंग आयडीचा तपशील समाविष्ट आहे. कॉम्प्राइज्ड डेटाच्या मदतीनं, टेकक्रंचनं स्पायवेअर लुकअप टूल विकसित केलं आहे. याच्या मदतीनं तुमचा फोन हॅक झाला आहे की नाही हे तुम्ही जाणून घेऊ शकता. तसेच तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरून स्पायवेअर काढू शकता. स्पायवेअर लुकअप टूल कसं कार्य करते ते आपण जाणून घेणार आहोत. हेही वाचा-  Jio 5G कधी लाँच होणार? रिचार्जसाठी किती मोजावे लागणार पैसे? ‘या’ दिवशी होऊ शकतो खुलासा याप्रमाणे तपासू शकता

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या