नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : बदलत्या काळात लोकांची सर्व कामं स्मार्टफोनच्या माध्यमातून केली जात आहे. स्मार्टफोनचा वापर करताना घाई-गडबडीत कधीतरी तो पाण्यात पडल्याच्या घटना अनेकांसोबत घडल्या आहेत. फोन पाण्यात पडल्यानंतर त्यातील कॉन्टॅक्ट आणि इतर डेटा डॅमेज होण्याची शक्यता असते. अशावेळी मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे स्मार्टफोन पाण्यात पडल्यानंतर युजरने तात्काळ काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं. या गोष्टी अजिबात करू नका - जर स्मार्टफोन पाण्यात पडला असेल तर त्याला फुंकर मारुन साफ करू नका. त्याचबरोबर युजर्स अनेकदा स्मार्टफोनला तात्काळ कोरडं करण्यासाठी त्याला जोरदार हलवतात किंवा स्मार्टफोनला तांदळाच्या किंवा अन्नधान्याच्या डब्यात ठेवतात. परंतु या गोष्टी (how to fix a water damaged phone that won’t turn on) टाळायला हव्या. त्यामुळे स्मार्टफोनचा चार्जिंग पॉइंट आणि CPU खराब होण्याची शक्यता असते.
Hair Dryer चा वापर कितपत योग्य? स्मार्टफोन पाण्यात पडल्यानंतर अनेक युजर्स त्याला Hair Dryer ने कोरडं करण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यामुळे स्मार्टफोन गरम होऊन (how to repair water damaged phone) बॅटरी डॅमेज होण्याचा धोका असतो. त्यामुळे हेयर ड्रायरचा वापर करण्याऐवजी स्मार्टफोनला कडक उन्हात वाळवायला हवं. पाण्यातून काढल्यानंतर तातडीने घ्या अशी काळजी - स्मार्टफोन पाण्यात पडल्यानंतर त्याला बाहेर काढून सर्वात आधी Switch Off करायला हवं. त्यानंतर त्यातील सिम कार्ड आणि बॅटरी रिमूव्ह करा. त्यानंतर स्मार्टफोनवर जमा झालेलं पाणी काढण्यासाठी त्याला टॉवेलने साफ करा.
स्मार्टफोनमधील पाणी सुकवण्यासाठी ही ट्रिक ठरेल फायदेशीर - स्मार्टफोनला पाण्यातून काढल्यानंतर त्याला योग्यरित्या पुसून टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवायला हवं. त्यामुळे त्यावरील पाणी साफ करता येईल. त्यानंतर स्मार्टफोनला अशा जागी ठेवा जी जागा जास्त थंड अथवा गरम नसेल. कारण अशा ठिकाणी स्मार्टफोन ठेवला तर काही तासांमध्येच त्यातलं पाणी सुकण्यास मदत होईल.
त्याचबरोबर इलेक्ट्रिक सामान किंवा Leather ची कोणती वस्तू तुम्ही याआधी खरेदी केलेली असेल, तर त्याच्या पॉकेटमध्ये स्मार्टफोनला ठेवा. त्यामुळे तो लवकर कोरडा होण्यास मदत होऊ शकते. फोन चालू होताच करा हे काम - स्मार्टफोन ड्राय होऊन सुरू होताच सर्वात आधी युजरने डेटा सुरक्षित आहे की नाही याची खात्री करायला हवी. कारण स्मार्टफोन पाण्यात पडल्यानंतर त्यातून महत्त्वपूर्ण डेटा किंवा कॉन्टॅक्ट गायब होण्याची शक्यता असते.