नवी दिल्ली, 23 जानेवारी : चांगली झोप येत नसल्याने अनेक जण त्रस्त असल्याचं पाहायला मिळतं. चांगली झोप येण्यासाठी, तसंच लगेच झोप येण्यासाठी कित्येक जण विविध उपायही करतात. पण एका बेडमुळे तुम्हाला चांगली झोप आली तर? चांगल्या, आरामदायी झोपेसाठी Sleep या कंपनीने Elev8 स्मार्ट बेड (Smart Bed) लाँच केला आहे. या बेडची महत्त्वाची बाब म्हणजे यात झिरो ग्रॅव्हेटी मोड (Zero Gravity Mode), ऑटोमेटिक मसाज (Automatic Massage), अँटी स्नोरिंग मोड (Anti-Snoring Mode) असे फीचर्स दिले आहेत. या स्मार्ट बेडमध्ये मोटोराइज्ड फ्रेम दिली गेली आहे. याच्या मदतीने व्यक्तीचे मूवमेंट कंट्रोल करता येतात. त्यासाठी यात वन-टच रिमोटही दिला गेला आहे. हा स्मार्ट बेड भारतात अॅमेझॉन इंडिया (Amazon India) आणि स्लिप कंपनीच्या (Sleep Company) अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असून खरेदी करता येऊ शकतो. हा स्मार्ट बेड किंग आणि क्विन अशा दोन साइजमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. या स्मार्ट बेडमध्ये नासाद्वारे (NASA) डेव्हलप केलेल्या सायन्टिफिक स्लिपिंग पोजिशनचा वापर केला असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यामुळे बॉडी स्ट्रेस रिड्यूस होत असल्याचंही कंपनीने म्हटलं आहे. त्यामुळेच झिरो ग्रॅव्हेटी किंवा वेटलेसनेसचा अनुभव मिळतो.
हा स्मार्ट बेड दोन्ही बाजूला वर होतो. त्यामुळे मान आणि पायांना आराम मिळून दुखणं कमी होऊ शकतं. तसंच ब्लड सर्कुलेशनही चांगलं होत असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. या स्मार्ट बेडमुळे घोरण्याचं प्रमाण कमी होत असल्याने शांत झोप मिळू शकते. या बेडवर तुमच्या आवडीची पोजिशन सेट करुन झोपता येतं. या मोडमध्ये आरामदायी वाचन किंवा टीव्ही पाहता येऊ शकतो. यासाठी अधिकच्या उशीचीही गरज भासणार नाही. एका बटणावर रीडिंग मोड अॅक्टिवेट होतो. इतकंच नाही, तर यात हेड आणि फूट मसाजसाठी ऑटोमेटिक मसाजर (Automatic Massager) देण्यात आला आहे. मसाजरचं प्रमाण रिमोटद्वारे कंट्रोल करता येतं.
Sleep Smart Bed च्या विना गादी क्विन साइजची किंमत 46,999 रुपये आहे. तर किंग साइजची किंमत 49,999 रुपये आहे. क्विन साइज बेडवर 8 इंची गादी टाकल्यानंतर याची किंमत 89,904 रुपये, तर किंग साइजची किंमत 79,394 रुपये आहे.