Home /News /technology /

Instagram देखील आता राहणार नाही फ्री! या फीचरसाठी तुम्हाला मोजावे लागणार पैसे

Instagram देखील आता राहणार नाही फ्री! या फीचरसाठी तुम्हाला मोजावे लागणार पैसे

या नव्या फीचरनुसार, ज्या युझरने क्रिएटरला सबस्क्राइब केले आहे, त्यालाच त्या क्रिएटरच्या स्टोरीज (Instagram Stories), लाइव्ह स्ट्रीम (Instagram Live Stream) आणि अन्य कंटेंट पाहता येणार आहे.

मुंबई, 22 जानेवारी: इन्स्टाग्राम (Instagram latest update) हा सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) आहे. जगभरात इन्स्टाग्रामचे अब्जावधी युझर्स आहेत. इन्स्टाग्रामचा फोटोज आणि व्हिडीओ शेअरिंगसाठी वापर होतो. इन्स्टाग्राम रील्स (Reels) नेटिझन्सचं विशेष आकर्षण आहे. शेअरिंगसह कमाई असा दुहेरी उद्देश या माध्यमातून साधला जातो. तुम्हीही इन्स्टाग्राम युझर आणि विशेषतः क्रिएटर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. इन्स्टाग्रामनं आता सबस्क्रिप्शन फीचरचं (Subscription Feature) टेस्टिंग सुरू केलं आहे. यामुळे क्रिएटर्सना केवळ पेड फॉलोअर्सपर्यंतच विशेष कंटेंट पोहोचवता येणार आहे. इन्स्टाग्राम हे तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय App आहे. अनेक क्रिएटिव्ह युवक-युवती माहितीपर, पर्यटनावर आधारित, मनोरंजनावर आधारित इन्स्टा रील्स शेअर करत असतात. अशा क्रिएटर्सचे लाखो फॉलोअर्स असतात. या सर्व पार्श्वभूमीवर इन्स्टाग्रामनं सबस्क्रिप्शन फीचरचं टेस्टिंग सुरू केलं आहे. सध्या अमेरिकेतल्या 10 क्रिएटर्सना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यात बास्केबॉलपटू सेडोना प्रिंस, मॉडेल केल्सी कूक, अभिनेता आणि एन्फ्लुएन्सर अॅलन चिकीन चाऊ, ऑलिंपिक पदकविजेता जिम्नॅस्ट जॉर्डन चिली आणि डिजिटल क्रिएटर लोनी यांचा समावेश आहे. हे वाचा-Two-Wheeler चालकांसाठी Alert! Helmet खरेदीवेळी या गोष्टी लक्षात ठेवाच, होईल फायद या नव्या फीचरनुसार, ज्या युझरने क्रिएटरला सबस्क्राइब केले आहे, त्यालाच त्या क्रिएटरच्या स्टोरीज (Instagram Stories), लाइव्ह स्ट्रीम (Instagram Live Stream) आणि अन्य कंटेंट पाहता येणार आहे. याशिवाय इन्स्टाग्राम त्यांच्या अॅपमध्ये व्हर्टिकल स्क्रोलिंग (Vertical Scrolling) आणि स्टोरीज रिडिझायनिंगबाबतही चाचणी घेत आहे. सोशल मीडिया सल्लागार मॅट नवरा यांच्या माहितीनुसार, 'तुर्कीतल्या काही युझर्सना व्हर्टिकल स्क्रोलिंगबाबत एक इन्स्टाग्राम अपडेट आलं. या फीचरमध्ये स्टोरीज स्क्रीनवर डाव्या किंवा उजव्या बाजूला टॅप करूनही पाहतात येतात. खालच्या बाजूला स्वाइप करून युझर पुढच्या स्टोरीवर जाऊ शकतो.' हे वाचा-पाकिस्तानातून चालणारी YouTube, Twitter आणि Facebook अकाउंट्स भारताने केली ब्लॉक सबस्क्रिप्शन फीचरबाबत इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत सांगितलं, 'ही मेंबरशिप क्रिएटर्ससाठी असेल. निर्माते उपजीविकेसाठी कोणत्या गोष्टी करतात, याचा केवळ अंदाजच लावता येऊ शकतो. फॉलोअर्सना अशा क्रिएटर्सच्या कंटेंटसाठी मेंबरशिप घ्यावी लागणार असून, त्याकरिता त्यांना मासिक शुल्क द्यावं लागणार आहे. ही मेंबरशीप फी 0.99 डॉलर्स म्हणजेच 73 रुपये प्रतिमहिना ते 99.99 डॉलर्स म्हणजेच 7447 रुपये प्रति महिना एवढी असू शकते.'त्यामुळे येत्या काळात आवडत्या क्रिएटर्सची रील्स किंवा अन्य कंटेंट पाहण्यासाठी त्यांच्या फॉलोअर्सला मेंबरशिप घेऊन मासिक शुल्क द्यावं लागणार आहे.
First published:

Tags: Instagram, Instagram post

पुढील बातम्या