नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : व्हिडीओ स्ट्रीमिंग कंपनी YouTube ने आपल्या नावे रेकॉर्ड केला आहे. भारतात दोन कोटीहून अधिक युजर्सने आपल्या टीव्हीवर YouTube पाहिलं. YouTube ने दिलेल्या माहितीनुसार, भारतात यावर्षी मेमध्ये दोन कोटीहून अधिक लोकांनी आपल्या टीव्ही स्क्रिनवर यूट्यूब पाहिलं, जे मागील वर्षीच्या तुलनेत 45 टक्के अधिक आहे. YouTube Viewers ची वाढती संख्या हिंदी, तमिळ, तेलुगू आणि इतर भारतीय भाषांमध्ये Content पाहणं अधिक पसंत करत असल्याचं समोर आलं आहे. Google इंडिया कंट्री मॅनेजर आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनी सांगितलं, की आधीपासून दोन कोटीहून असे ग्राहक आहेत, जे कनेक्टेड टीव्हीवर कंटेंट पाहतात. त्यामुळे कंटेंट पाहणं, त्यातील विविधता, कंटेंट प्रोड्यूसर यांबाबतची माहिती केवळ मोबाईल फोनपर्यंत मर्यादित नाही. ही एक अशी घटना आहे, जी मोबाईल फोन आणि कनेक्टेड टीव्ही दोन्हीवर आहे. Google भारताला एक लीडिंग डिजीटल इकॉनॉमी बनवण्यात मदत करण्यासाठी प्रतिबद्ध आहे आणि यूट्यूबसह डिजीटल व्हिडीओ (Digital Video) यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. यूट्यूब पार्टनरशिपचे डायरेक्टर सत्य राघवन यांनी सांगितलं, की मोठ्या संख्येत लोक विश्वासार्ह्य कंटेंट, माहितीसाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी या यूट्यूब व्हिडीओचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. राघवन यांनी सांगितलं, की भारतात 85 टक्के व्हिडीओ व्ह्यूवर्सनी त्यांनी कोरोना व्हायरसनंतर आधीपेक्षा अधिक प्रमाणात यूट्यूबचा वापर सूरू केला.
YouTube वर ट्रान्सलेट करता येणार कमेंट्स - YouTube 100 हून अधिक भाषांमध्ये कमेंट्सचं ट्रान्सलेशन करण्याची सुविधा देतं. हे फीचर येत्या काळात मोबाईल युजर्ससाठी सुरू होणार आहे. या फीचरमुळे YouTube Mobile App मध्ये ट्रान्सलेशन करुन दुसऱ्या भाषेत कमेंट्स वाचण्याची सुविधा मिळते. YouTube App मध्ये आता प्रत्येक कमेंटच्या खाली एक ट्रान्सलेशन बटण आहे, ज्याद्वारे त्या कमेंटचं ट्रान्सलेशन इनेबल केलं जाईल.
कंपनीने ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. हे फीचर Android आणि iOS दोन्हीसाठी YouTube App वर लाईव्ह आहे आणि ट्रान्सलेशन बटण कमेंटच्या खाली दिलं जाईल.