नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : कोरियन स्मार्टफोन कंपनी Samsung लवकरच एक नवा 5G Smartphone लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्टनुसार या स्मार्टफोनमध्ये (Samsung upcoming Smartphone 2021) जबरदस्त फीचर्स देण्यात येणार असून त्याची किंमतही कमी असणार आहे. यासंदर्भात कंपनीकडून अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. लवकरच याबाबत कंपनी अधिकृत घोषणा करेल असं बोललं जात आहे. काय असतील फीचर्स? Samsung Galaxy A13 या 5G स्मार्टफोनला अमेरिकेच्या Federal Communications Commission ची परवानगी मिळाली असून FCC ने या स्मार्टफोनच्या काही फीचर्सबद्दल खुलासा केला आहे. त्यामुळे या स्मार्टफोनच्या (Samsung galaxy a13 5g specifications) फीचर्सची चर्चा सुरू झाली आहे. हा स्मार्टफोन Dimension Chipset वर काम करतो आणि त्यात 6.48-इंची IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात Full HD+ Resolution ची ही सुविधा असणार आहे.
FCC च्या लिस्टिंगनुसार या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh चा दमदार बॅटरी बॅकअप, 15W क्षमतेचा फास्ट चार्जर सपोर्ट असणार आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनच्या सिरीजमध्ये 4GB RAM+64GB, 6GB RAM+128GB आणि 8GB RAM+128GB चं Internal Storage असेल. सोबतच Samsung Galaxy A13 हा स्मार्टफोन Android 11 द्वारे काम करणार आहे.
किती मेगापिक्सलचा असेल कॅमेरा? Samsung च्या 5G स्मार्टफोनमध्ये Rear Camera Setup मध्ये तीन Sensors असतील. ज्यात 50MP चा मुख्य सेन्सर, 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा Macro सेन्सर असणार आहे. सेल्फीसाठी यात 5MP फ्रंट कॅमेरा असणार असल्याचं बोललं जात आहे. सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये Fingerprint Scanner ची ही सुविधा देण्यात येणार आहे.
सध्या भारतात या स्मार्टफोनची किंमत अजून जारी करण्यात आलेली नाही. परंतु मिळालेल्या माहितीनुसार या स्मार्टफोनची किंमत ही 18,587 रुपये असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनला या महिन्याअखेरीस (Samsung galaxy a13 5g release date) लॉन्च केलं जाण्याची शक्यता आहे.