JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Reliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार? जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Reliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार? जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

रिलायन्स त्यांचा रिलायन्स जियो 5G फोन लाँच करण्याची शक्यता आहे. सोबतच या इव्हेंटमध्ये बजेट Jio Book Laptop आणि JioBook सारखे प्रॉडक्ट लाँच केले जातील, अशी माहिती आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 जून : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची (Reliance annual meeting) वार्षिक सर्वसाधारण सभा 24 जून रोजी होणार आहे. या मीटिंगमध्ये रिलायन्स काही महत्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. शिवाय त्यांच्या अनेक नवीन प्रॉडक्ट्सबद्दल (products) माहिती देण्याची शक्यता आहे. Cnbctv18 ने दिलेल्या वृत्तानुसार, जनरल मीटिंगमध्ये रिलायन्स त्यांचा रिलायन्स जियो 5G फोन लाँच करण्याची शक्यता आहे. सोबतच या इव्हेंटमध्ये बजेट Jio Book Laptop आणि JioBook सारखे प्रॉडक्ट लाँच केले जातील, अशी माहिती आहे. रिलायन्सने गेल्या वर्षीच्या त्यांच्या जनरल मीटिंगमध्ये भारतात सर्वात स्वस्त 5G स्मार्ट फोन लाँच करण्याची घोषणा केली होती. हा फोन ते गूगलच्या (google) मदतीने लाँच करतील असंही त्यांनी सांगितलं होतं. या फोनमध्ये कस्टम अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम दिलं जाणार आहे. त्यानंतर ते अँड्रॉईड वन सोबत येऊ शकतं. हे ऑपरेटिंग सिस्टम एन्ट्री लेवल स्मार्टफोन्ससाठी असतं. काही रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 480 5G प्रोसेसरचा वापर केला जाऊ शकतो. हा प्रोसेसर क्वालकॉमचा सर्वात स्वस्त 5G चिपसेट आहे. याशिवाय जिओच्या स्वस्त 5G फोनमध्ये 2.4 इंची TFT डिस्प्ले दिला जाईल, जो 320X240 रेझोल्यूशनसोबत येईल असंही सांगण्यात आलं आहे. फोनमध्ये 512MB स्टोरेज आणि 4 जीबी RAM असेल. याशिवाय या फोनमध्ये 2 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 2000mAh ची बॅटरी देण्यात येणार आहे.

(वाचा -  तुमच्या कामाची बातमी! मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय? या गोष्टी लक्षात ठेवाच )

मात्र, कंपनीने अद्याप फीचर्सबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. हा 5G फोन फीचर एन्ट्री लेव्हल फोन असेल अशी आशा वर्तवण्यात येत आहे. रिपोर्ट्समधील माहितीनुसार फोनमध्ये जास्त फीचर असण्याची शक्यता नाही. मात्र, फोन फेसबुक, यूट्यूब आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या अ‍ॅप्सला सपोर्ट करेल. (वाचा -  धमाकेदार ऑफर; केवळ 1 रुपयांत मिळवा ProBuds Earbuds, 25 तासांपर्यंत चालेल बॅटरी ) किती असेल किंमत? या 5G जिओ फोनच्या किमतीचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, स्मार्टफोनची किंमत अडीच हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते, असा अंदाज आहे. तर आतापर्यंत फोनबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फोनची किंमत अडीच हजार ते 5 हजार रुपयांच्या दरम्यानही असू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या