नवी दिल्ली, 14 मार्च : नवीन बजेट फोन (Budget Smartphone) घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक धमाकेदार ऑफर आहे. अॅमेझॉनवर (Amazon) स्वस्तात फोन खरेदी करण्याची संधी आहे. रेडमी 9A (Xiaomi Redmi 9A) फोन कंपनीने 6999 रुपयांच्या सुरुवाती किंमतीत लाँच केला आहे. परंतु हा फोन केवळ 329 रुपयांच्या प्रति महिना EMI वर खरेदी करता येणार आहे. हा फोन इतक्या कमी EMI मध्ये घरी घेऊन जाता येणार आहे. Xiaomi Redmi 9A हा फोन दोन वेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला. पहिल्या वेरिएंटमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज देण्यात आलं आहे, याची किंमत 6999 रुपये आणि दुसऱ्या वेरिएंटमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असून याची किंमत 7499 रुपये आहे. 2 GB वेरिएंटमध्ये EMI द्वारे कमीत-कमी 329 रुपये द्यावे लागतील. हा EMI पर्याय अनेक बँक कार्डवर देण्यात येत आहे. परंतु 329 रुपयांची सर्वात कमी EMI ऑफर ग्राहकांना इंडस्लँडच्या क्रेडिट कार्डद्वारे देण्यात येत आहे. त्याशिवाय 6600 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे.
दुसरीकडे 3 GB वेरिएंटमध्ये कमीत कमी 353 रुपये EMI द्यावा लागेल. ही सर्वात कमी EMI ऑफर इंडस्लँड क्रेडिट कार्डद्वारे देण्यात येत आहे. तसंच 7100 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे. Xiaomi Redmi 9A फीचर्स - - 6.53 इंची IPS डिस्प्ले - अँड्रॉईड 10 बेस्ड MIUI 12 - मीडिया टेक हीलियो G25 प्रोसेसर - गेमिंगसाठी हायपर इंजिन गेम टेक्नोलॉजी - ऑरा 360 डिझाईन फोनमध्ये, यूनीबॉडी 3D डिझाईन - 5000mAh बॅटरी - 10W फास्ट चार्जर
कॅमेरा - रेडमी 9A मध्ये LED फ्लॅशसह 13 मेगापिक्सल AI कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटमध्ये सेल्फीसाठी 5 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच फोनमध्ये 24 तासांपर्यंत व्हिडीओ पाहता येऊ शकतात, फोनची बॅटरी दोन दिवसांपर्यंत बॅकअप देऊ शकते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.