JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / बटाटा विक्रेत्याची कमाल! VIP मोबाईल नंबरसाठी मोजले चक्क इतके लाख; 3 iPhone एवढी आहे Price

बटाटा विक्रेत्याची कमाल! VIP मोबाईल नंबरसाठी मोजले चक्क इतके लाख; 3 iPhone एवढी आहे Price

राजस्थानमधील कोटा शहरातील एका बटाटा विक्रेत्यानं (Potato seller purchase BSNLs VIP number) चक्क 2.4 लाख रूपये खर्च करून BSNL चा VIP नंबर विकत घेतला आहे. त्यामुळं आता या व्यवहाराची सोशल मीडियावर फार चर्चा होत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : सध्याच्या काळात प्रत्येकाला आपला मोबाईल नंबर VIP असावा असं वाटतं. त्यासाठी अनेक युजर्स लाखो रूपये देण्यासाठी तयार असतात. कारण  VIP नंबर्समध्ये यूनिक सिरीयल असते आणि ते लक्षात ठेवायला फार अवघडही नसतात. काही लोकांना विशिष्ट संख्या (BSNL fancy numbers booking) लाइफमध्ये लकी वाटते म्हणून देखील ते खरेदी करत असतात. परंतु आता राजस्थानमधील कोटा शहरातील एका बटाटा विक्रेत्यानं (Potato seller purchase BSNLs VIP number) चक्क 2.4 लाख रूपये खर्च करून BSNL चा VIP नंबर विकत घेतला आहे. त्यामुळं आता या व्यवहाराची सोशल मीडियावर फार चर्चा होत आहे. 2.4 लाखांमध्ये येऊ शकतात तीन iPhone 13 स्मार्टफोन्स BSNL च्या VIP नंबर्सची कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलवर विक्री सुरू होती. त्यात सहा झीरो असलेल्या सिरियल नंबर्सची विक्री सुरू होती. त्यात कोटा शहरातील बटाटा व्यापारी (bsnl vip number for sale) तनुज दुदेजा यांनी VIP नंबर्ससाठी 2.4 लाख रुपयांची बोली लाऊन तो खरेदी केला आहे.

आता Samsung कंपनी बनवणार Foldable स्मार्टफोन; पाहा फीचर्स

या किंमतीमध्ये Apple कंपनीचे 3 iPhone 13 स्मार्टफोन खरेदी करता येऊ शकतात. BSNL च्या VIP नंबर्सची एका आठवड्यापासून बोली लावण्यात येत होती. ही बोली 20 हजार रूपयांपासून सुरू झाली होती आणि त्याचा शेवट हा 2 लाख रूपायांच्या वर झाला आहे.

30 मिनटांत Xiaomi च्या 20 लाखांहुन अधिक Smart Watch ची विक्री…पाहा डिटेल्स

दुदेजा यांनी दुसऱ्यांदा खरेदी केला VIP नंबर VIP नंबर्सची बोली जिंकणाऱ्या बटाटा व्यापारी दुदेजा यांनी पैसे भरल्यानंतर BSNL च्या फर्रुखाबाद कार्यालयातून VIP मोबाइल नंबर कलेक्ट केला आहे. दुदेजा यांना असे VIP नंबर वापरणं आवडतं. त्यांनी याआधीही एक लाख रूपयांच्या VIP नंबरची बोली जिंकली होती. त्यामुळं आता या प्रकरणाची सोशल मीडियावर फार चर्चा होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या