PM मोदींच्या हस्ते 1 ऑक्टोंबरला देशात 5G होणार लाँच, ‘या’ शहरांना सर्वप्रथम मिळणार सेवा
मुंबई, 28 सप्टेंबर: गेल्या अनेक दिवसांपासून देशामध्ये 5G सेवेबद्दल उत्सुकता आहे. 5G सेवा देशात कधी लाँच होणार याकडे सर्व देशवासीयांचं लक्ष लागून राहिलं होतं. अलीकडेच रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांनी दिवाळीपूर्वी देशात 5G सेवा लाँच होणार असल्याचं म्हटलं होतं. आता मात्र देशात 5G सेवेच्या लाँचिंग मुहूर्त निश्चित झाला असून 1 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशात 5G सेवा लाँच होणार आहे. ऑक्टोबरपासून अनेक शहरांमध्ये 5G सेवा उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात देशातील निवडक शहरांत 5G सेवा लाँच होणार असून यामध्ये महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यांत देशातील काही शहरांमध्ये 5G सेवा सुरु होईल आणि टप्प्याटप्प्यानं पुढील काळात देशभरामध्ये इतर शहरांतही 5G सेवेचा विस्तार केला होईल. देशातील या शहरांमध्ये होणार 5G सेवेचा शुभारंभ:
5G मुळे आयुष्य होईल सुपरफास्ट: 5G सेवेचा शुभारंभ झाल्यानंतर देशातील विविध क्षेत्रावर त्याचा परिणाम होणार आहे. एकमेकांशी जलद संपर्क साधणं सोपं होईलच परंतु इतर क्षेत्रांतही 5G मुळं क्रांती होईल. 5G नेटवर्कची वैशिष्ट्ये:
हेही वाचाः दिवाळीआधी 5G चा मोठा धमाका, सर्वात मोठा विक्रम करणार 5G सेवेमुळं काय लाभ होणार-
अशा प्रकारे बदलेल कार्यालयीन जीवन-