नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : कोरोना काळापासून डिजीटल व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. टपरीवरील चहावाल्यापासून ते भाजीवाले, शॉपिंग मॉल सर्वच लहान-मोठ्या ठिकाणी ऑनलाइन पेमेंटची (Online Payment) सुविधा उपलब्ध आहे. अनेक जण गुगल पे (Google Pay), पेटीएमचा (Paytm) वापर करुन जलद ऑनलाइन पेमेंट करतात. आता पेटीएममध्ये एक असं फीचर आलं आहे, जे तुम्हाला App ओपन न करताच पेमेंट करण्याची परवानगी देतो, तेही इंटरनेटशिवाय. Paytm ने युजर्साच्या सुविधेसाठी नवं फीचर लाँच केलं आहे. टॅप टू पे (Tap to Pay) असं हे फीचर असून याद्वारे पेटीएम अॅप ओपन न करताच विना इंटरनेट पेमेंट करण्याची सुविधा मिळणार आहे.
यासाठी काही गोष्टी असणं महत्त्वाचं आहे. सर्वात आधी तुमचं पेटीएम अॅप अपडेट असावं. अॅपमध्ये अॅक्टिव्ह डेबिट-क्रेडिट कार्ड लिंक असणं गरजेचं आहे.
App ओपन न करता कसं कराल पेमेंट - - सर्वात आधी फोनमध्ये Paytm App ओपन करा. - आता स्क्रोल करुन My Paytm सेक्शनमध्ये Tap to Pay वर क्लिक करा. - आता सर्वात खाली Add New Card बटणावर टॅप करा आणि कार्ड डिटेल्स टाका. - इथे आधीच सेव्ह केलेलं कार्डही निवडू शकता. - आता Terms and Conditions वर क्लिक करुन वेरिफाय करण्यासाठी Proceed वर क्लिक करा. -Tap to Pay चा वापर करुन पेमेंट करण्यासाठी स्मार्टफोन अनलॉक करा आणि NFC अॅक्टिवेट करा. - आता स्मार्टफोन NFC- Activated POS machine जवळ घेऊन जा आणि पेमेंट होईपर्यंत फोन स्थिर ठेवा. - 5000 रुपयांच्या अधिकच्या व्यवहारांसाठी POS मशीनवर कार्डचा पीन नंबर टाकावा लागेल.
दरम्यान, कंपनीला एका फेक Paytm App ची माहिती मिळाली आहे. यामुळे चुकीच्या पेमेंट कन्फर्मेशन पेजवर पोहोचवलं जातं. सोशल मीडियावर Paytm Spoof हे अगदी खऱ्या Paytm प्रमाणे दिसणारं App असून यामुळे चुकीच्या पेमेंट कन्फर्मेशन पेजवर पोहोचवलं जात असल्याचं सांगण्यात आलं आहे.