नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी OPPO ने ऑक्टोबर 2020 मध्ये Smart Television Category क्षेत्रात जबरदस्त एन्ट्री केली होती. त्यावेळी OPPO ने OPPO Smart TV S1 आणि OPPO Smart TV R1 हे दोन मॉ़डेल (OPPO is bringing a fantastic Smart TV) लॉन्च केले होते. त्यानंतर आता ओप्पो कंपनी त्याचं नवं वेरिएंट लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. OPPO Reno7 सोबतच लॉन्च होणार Smart TV - मिळालेल्या माहितीनुसार, एका लाईव्ह इवेंटमध्ये OPPO Enco Free2i TWS शिवाय Smart TV R1 Enjoy Edition लाँच केलं जाणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांसाठी हा स्मार्ट टीव्ही लवकरच खरेदीसाठी उपलब्ध होऊ शकतो.
असणार जबरदस्त Audio Quality - हे मॉडेल OPPO Smart TV R1 चं नवं व्हर्जन असून त्यात जबरदस्त Dynadio चा वापर करून ऑडियो क्वालिटी देण्यात (oppo smart tv r1 review) येणार आहे. त्यामुळे युजर्सला या स्मार्ट टीव्हीचा वापर करताना घरातच थेटरचा आनंद घेता येईल.
मागच्या व्हर्जनमध्ये होती ही कमी - ओप्पोने याआधी लॉन्च केलेल्या OPPO Smart TV R1 मध्ये Dynadio Tuning ची कमी होती. त्याशिवाय OPPO Smart TV S1 मध्येही ही सुविधा देण्यात आलेली नव्हती.
OPPO Smart TV R1 चे फीचर्स - OPPO Smart TV R1 मध्ये 4K LCD पॅनल, 93% DCI-P3 कलर गॅमिट, MEMC, मीडियाटेक एमटीके 9652 चिपसेट, 2GB रॅम, 32GB स्टोरेज, 8K Video Playback Support, Wifi-6, HDMI 2.1, ओप्पो शेयर, एनएफसी रिमोट कंट्रोल, पॉप-अप कॅमेरा, 20W स्पीकर, Dolby Audio, फार फील्ड माइक्रोफोन आणि ColorOS TV Operating System ची सुविधा देण्यात आलेली आहे.