जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / ट्विटर युजर्ससाठी खूशखबर! ट्विटर आणत आहे लाइव्ह शॉपिंग फीचर

ट्विटर युजर्ससाठी खूशखबर! ट्विटर आणत आहे लाइव्ह शॉपिंग फीचर

twitter

twitter

सोशल मीडियात सध्या परवलीचे ठरलेले ट्विटर (Twitter) हे आता ट्विटर आयएनसीच्या माध्यमातून आणखी एक सेवा घेऊन येत आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर:  ट्विटर आयएनसी (Twitter Inc) या आठवड्यात लाइव्ह शॉपिंग फीचरचं टेस्टिंग घेण्यासाठी वॉलमार्ट (Walmart) सोबत सज्ज झाली आहे. यामुळे युजर्सला रिअल टाइम व्हिडिओ ब्रॉडकास्टमध्ये प्रमोट केली जाणारी उत्पादनं खरेदी करण्याची संधी मिळेल. किरकोळ विक्रीच्या क्षेत्रात काम करणारी जगातील सर्वात मोठी वॉलमार्ट कंपनी 28 नोव्हेंबर 2021 रोजी लाइव्ह कार्यक्रमादरम्यान नवीन टूलद्वारे विक्री करणारी पहिली कंपनी असेल. ट्विटरने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे, ‘दिग्गज संगीतकार जेसन डेरुलोसह ट्विटर अॅपवर हे ब्रॉडकास्ट प्रसारित करण्यात येईल, आणि वापरकर्ते थेट व्हिडिओ पाहताना उत्पादन कॅटलॉग ब्राउझ करू शकतील. खरेदी करण्यासाठी क्लिक केल्यानंतर पुढील व्यवहार पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना वॉलमार्टच्या वेबसाइटवर पाठवले जाईल .सॅन फ्रान्सिस्को येथील ट्विटर च्या अधिकाऱ्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला सांगितले होते की, ‘ते खरेदीकडे व्यवसायाची संधी म्हणून पाहतात,परंतु या प्रयत्नांना अजून चालना देण्यासाठी काही प्रयोग करणं बाकी आहे.’

    शॉप मॉड्यूल केलं होतं जाहीर

    ट्विटर (Twitter) ने जुलैमध्ये एक ‘शॉप मॉड्यूल’ ( Shop Module ) जाहीर केलं होतं. जे काही किरकोळ विक्रेत्यांना त्यांच्या ट्विटर प्रोफाइलमध्ये उत्पादने जोडू देण्यासाठी उपयोगी होते. पण हा प्रोग्राम टेस्टिंग कालावधीनंतर ऑफलाइन झाला होता. आता पुढील महिन्यात तो पुन्हा सुरू केला जाणार आहे. कंपनी कोणत्याही व्यवहारात कपात करीत नसून पेमेंटवर सुद्धा कोणतीही प्रक्रिया करत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ट्विटर आता 89 टक्के विक्रीचा वाटा असलेल्या डिजिटल जाहिरातींवरील त्यांचं अवलंबित्व कमी करण्यासाठी स्वतःचा व्यवसाय वाढवण्याचे मार्ग शोधत आहे. कंपनीने नुकतेच मासिक सब्सक्रिप्शन प्रॉडक्टदेखील लाँच केलं आहे. काही ऑनलाइन रिटेल व्यवसाय कॅप्चर करू पाहणाऱ्या सोशल नेटवर्क्ससाठी लाइव्ह खरेदी हे एक लोकप्रिय टेस्टिंग ग्राउंड बनले आहे. मेटा प्लेटफॉर्म्स आयएनसी (Meta Platforms Inc.) देखील लाइव्ह शॉपिंग सुविधा देत आहे, आणि Pinterest ने या महिन्याच्या सुरुवातीला अशीच सेवा सुरू केली आहे. सध्या सुरू असलेल्या सुट्टीच्या हंगामात गुगल (Google) चे यु ट्यूब (YouTube) देखील Amazon.com Inc ला स्पर्धा निर्माण करण्याच्या दृष्टीने लाइव्ह खरेदीवर जोर देत आहे. सोशल मीडियात सध्या परवलीचे ठरलेले ट्विटर (Twitter) हे आता ट्विटर आयएनसीच्या माध्यमातून आणखी एक सेवा घेऊन येत आहे. यामध्ये कंपनीला कितपत यश येईल, हे लवकरच स्पष्ट होईल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात