JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / अलर्ट! Review पाहून Online Shopping करताय; मग आधी हे वाचाच

अलर्ट! Review पाहून Online Shopping करताय; मग आधी हे वाचाच

एखाद्या वस्तूवर दिलेले जाणारे रिव्ह्यू एक प्रकारचा स्कॅम आहे. म्हणजेच तुम्ही ज्या प्रोडक्ट वरचे रिव्ह्यू पाहता, त्यापैकी अनेक Review फेक असतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 मे : ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) करताना युजर्स सर्वात आधी एखाद्या प्रोडक्टच्या रिव्ह्यूची (Product Review) तपासणी करतो. अनेक जण ऑनलाईन वस्तू घेताना आपल्या मित्र, नातेवाईकांचंही मत घेतात. परंतु एखाद्या नव्या लाँच झालेल्या वस्तूबाबत किंवा इतरही प्रोडक्टबाबत युजर्स ऑनलाईन त्या वस्तूवर दिलेले Review पाहतात आणि त्यानुसार वस्तू खरेदी करायची की नाही हे ठरवतात. पण एखाद्या वस्तूवर दिलेले जाणारे रिव्ह्यू एक प्रकारचा स्कॅम आहे. म्हणजेच तुम्ही ज्या प्रोडक्ट वरचे रिव्ह्यू पाहता, त्यापैकी अनेक Review फेक असतात. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनचा फेक रिव्ह्यू स्कॅम (Fake Review Scam) समोर आला आहे. यामुळे आतापर्यंत 2 लाखहून अधिक युजर्सला फटका बसला आहे. याबाबतचा खुलासा सेफ्टी डिटेक्टिव्सने चिनी आधारित सर्व्हरच्या मदतीने केला आहे. अ‍ॅपल इंसायडरच्या रिपोर्टनुसार, यात स्कॅमबाबत माहिती देण्यात आली आहे. कसा होतो स्कॅम - अ‍ॅमेझॉन वेंडर्स काही प्रोडक्ट्स रिव्ह्यूअर्सकडे पाठवतात. हे असे प्रोडक्ट असतात, ज्यावर 5 स्टार रेटिंग हवी असते. हे रिव्ह्यूअर्स या प्रोडक्टला 5 स्टारची रेटिंग देतात. त्यामुळे Suggestion मध्ये हे प्रोडक्ट टॉपवर येतात. अशात ज्यावेळी कोणताही युजर, कोणतंही प्रोडक्ट सर्च करतो, त्यावेळी त्याला असे प्रोडक्टचं टॉपवर दिसतात.

(वाचा -  इंटरनेटशिवाय वापरा WhatsApp! जाणून घ्या या नव्या फीचरबाबत )

एकदा अ‍ॅमेझॉनवर रिव्ह्यू दिल्यानंतर, रिव्ह्यूअर्स ते प्रोडक्ट पुन्हा वेंडर्सकडे पाठवतात. अशाप्रकारे दिलेल्या 5 स्टार रेटिंगसाठी रिव्ह्यूअर्सला कॅश रिवॉर्डही मिळतात.

(वाचा -  WhatsApp: 15 मेपर्यंत Privacy Policy न स्वीकारल्यास अकाउंट बंद होणार नाही, पण… )

डेटाबेसमध्ये याबाबतच्या एका ऑपरेशनचाही खुलासा करण्यात आला आहे, ज्याची तारीख 1 मार्च 2021 आहे. या दरम्यान 13 मिलियन रेकॉर्ड्स म्हणजेच 75 जीबी डेटा कोणत्याही पासवर्ड प्रोटेक्शनशिवाय होस्ट करण्यात आला होता. डेटाबेसमध्ये अशाप्रकारे अ‍ॅमेझॉन रिव्ह्यू स्कॅममध्ये भाग घेतलेल्या वेंडर्सच्या ईमेलसह, व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्राम नंबरचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या