JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Online Fraud मध्ये पैसे कट झाले? या पद्धतीने मिळू शकतात परत

Online Fraud मध्ये पैसे कट झाले? या पद्धतीने मिळू शकतात परत

ऑनलाइन फ्रॉडच्या जाळ्यात कोणी अडकल्यास काही गोष्टी फॉलो करुन तुम्ही पैसे परत मिळवू शकता. ऑनलाइन फ्रॉड झाल्यास लगेच त्यावर त्वरित अॅक्शन घेणं गरजेचं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 1 मार्च : कोरोना काळापासून डिजीटल व्यवहारात (Digital Transactions) मोठी वाढ झाली आहे. डिजीटल झाल्याचे अनेक फायदे आहेत. तसंच दुसरीकडे याचे तोटेही आहेत. अनेकदा डिजीटल व्यवहार काळजीपूर्वक न केल्यास ऑनलाइन फ्रॉड (Online Fraud) होण्याचा धोका असतो. सायबर क्राइमच्या (Cyber Crime) अनेक घटना समोर आल्या आहेत. एकीकडे डिजीटल ट्रान्झेक्शन वाढल्यानंतर बँकिंग-फायनेंशियल फ्रॉडच्या घटनाही वाढल्या आहेत. अनेक लोक फ्रॉडस्टर्सच्या जाळ्यात अडकतात. ऑनलाइन फ्रॉडच्या जाळ्यात कोणी अडकल्यास काही गोष्टी फॉलो करुन तुम्ही पैसे परत मिळवू शकता. ऑनलाइन फ्रॉड झाल्यास लगेच त्यावर त्वरित अॅक्शन घेणं गरजेचं आहे. जितकी लवकर यावर अॅक्शन घेतली जाईल, तितके लवकर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे परत येण्याची शक्यता अधिक असते. अनेकदा लोक घाबरतात, अशा परिस्थितीत काय करायचं समजत नाही आणि यात वेळ गेल्यानंतर पैसे मिळण्याची शक्यता कमी होते.

हे वाचा -  एका मेसेज आणि अभिनेत्रीच्या बँक खात्यातून चोरी झाले 1.48 लाख रुपये; अशी चूक चुकूनही करू नका

ऑनलाइन फ्रॉड झाल्याचं लक्षात आल्यानंतर लगेचच तुमच्या बँकेकडे याबाबत माहिती द्या. जर तुमच्या अकाउंटमधून पैसे कट झाले असतील, तर याबाबत तीन दिवसांच्या आत तक्रार दाखल करावी लागेल. याची तक्रार तुम्ही https://www.cybercrime.gov.in/ वर किंवा लोकल पोलीस स्टेशनमध्ये करू शकता. जर वेळीच सायबर फ्रॉडबाबत अॅक्शन घेतली, तर तुमचा नुकसानापासून बचाव होऊ शकतो. जर तुम्ही OTP शेअर केला नसेल, तर 10 दिवसांच्या आत तुम्हाला रिफंड येईल. ऑनलाइन फ्रॉड झाल्यानंतर याची लेखी सूचना बँकेकडे द्यावी लागेल आणि याची एक कॉपी तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे.

हे वाचा -  Smartphone द्वारे काही सेकंदात चोरी झाले 64 लाख रुपये,वाचा कसा झाला Online Fraud

परंतु ऑनलाइन फ्रॉड होऊच नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. कधीही-कोणालाही तुमची पर्सनल माहिती देऊ नका. बँकिंग डिटेल्स, तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी इतरांशी शेअर करू नका. कोणी बँकेचा अधिकारी, टेलिकॉम कंपनीचा अधिकारी किंवा आधार-पॅन केंद्रातून किंवा एखाद्या संस्थेतून बोलत असल्याचं सांगून तुमचे कार्ड डिटेल्स, बँक, आधार-पॅन कार्डची माहिती मागितल्यास देऊ नका. कोणीही ऑनलाइन एखादं App डाउनलोड करण्यास सांगितल्यास ते करू नका. काही Apps मुळे तुमच्या मोबाइल फोनचा अॅक्सेस दुसऱ्या व्यक्तीला मिळतो आणि फ्रॉड केला जातो. या काही गोष्टी लक्षात ठेवल्यास ऑनलाइन फ्रॉडपासून बचाव होऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या