JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Online Fraud मध्ये मिळेल सुरक्षा, IRDAI कडून Cyber Insurance कव्हरमध्ये वाढ

Online Fraud मध्ये मिळेल सुरक्षा, IRDAI कडून Cyber Insurance कव्हरमध्ये वाढ

IRDAI ने इन्शोरन्स कंपन्यांना सायबर फसवणूक, अनधिकृत व्यवहार, ईमेल स्पूफिंगमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाविरुद्ध कव्हर देण्याबाबत सांगण्यात आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : कोरोना काळात ऑनलाईन फ्रॉडच्या (Online Fraud) संख्येत मोठी वाढ झाली. यात अनेक सर्वसामान्यांची फसवणुकही झाली. हेच पाहता Insurance Regulatory and Development Authority अर्थात इरडाने (IRDAI) सायबर इन्शोरन्स (Cyber Insurance) कव्हर वाढवला आहे. इरडाने सायबर इन्शोरन्स अंतर्गत कव्हर होणाऱ्या गोष्टी पूर्णपणे स्पष्ट केल्या आहेत. IRDAI ने इन्शोरन्स कंपन्यांना सायबर फसवणूक, अनधिकृत व्यवहार, ईमेल स्पूफिंगमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाविरुद्ध कव्हर देण्याबाबत सांगण्यात आलं आहे. IRDAI ने दिलेल्या माहितीनुसार, सायबर इन्शोरन्स कव्हर वाढवला जाईल. ज्यात कंपन्या सायबर इन्शोरन्स पॉलिसी अधिक सोप्या करतील. कोरोना काळात सायबर फ्रॉडमध्ये (Cyber Fraud) मोठी वाढ झाली आहे. डिजीटल व्यवहारात वाढ झाल्याने सायबर धोके वाढले आहेत.

दिवसभरात Instagram वर किती वेळ घालवला? सोप्या ट्रिकने असं तपासा

सायबर इन्शोरन्समध्ये काय कव्हर होणार? - पैसे चोरी नुकसान - अनधिकृत ऑनलाईन व्यवहार - सोशल मीडियाद्वारे थर्ड पार्टी नुकसान - ईमेल स्पूफिंग - फिशिंग अटॅक नुकसान भरपाई - सायबर एक्सटॉर्शन कव्हर - डेटा ब्रीच आणि प्रायव्हसी ब्रीच कव्हर

Phishing Email म्हणजे नेमकं काय? यापासून राहा सावध, अन्यथा बसू शकतो मोठा फटका

क्लेम कधी रिजेक्ट होऊ शकतो?

सायबर इन्शोरन्स क्लेम रिजेक्ट होण्याबाबतही IRDAI कडून निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार, सायबर फ्रॉड झाल्याच्या 24 तासांच्या आता कार्ड ब्लॉक न केल्यास क्लेम रिजेक्ट केला जाईल. बँकेतून SMS आणि OTP साठी रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी नसल्यासही सायबर इन्शोरन्स क्लेम रिजेक्ट होऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या