JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / SIM वेरिफिकेशनसाठी मागितले 11 रुपये, पण डॉक्टरच्या खात्यातून तब्बल 6 लाख गायब; अशी झाली फसवणूक

SIM वेरिफिकेशनसाठी मागितले 11 रुपये, पण डॉक्टरच्या खात्यातून तब्बल 6 लाख गायब; अशी झाली फसवणूक

भोपाळ, 2 ऑगस्ट : वाढत्या डिजीटल काळात ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud), सायबर क्राईमच्या (Cyber Crime) संख्येतही मोठी वाढ झाली आहे. OTP, KYC, SIM card अशा अनेक कारणांनी आतापर्यंत अनेकांची मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे. फसवणुकीचा असाच एक प्रकार मध्यप्रदेशातील रीवामध्ये समोर आला असून केवळ 11 रुपयांच्या नावाने एका डॉक्टरच्या खात्यातून फ्रॉड करणाऱ्यांनी तब्बल 6 लाखांची रक्कम उडवली आहे. SIM कार्ड वेरिफिकेशनच्या (SIM Card Verification) नावाने डॉक्टरला मोठा गंडा घालण्यात आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 2 ऑगस्ट : वाढत्या डिजीटल काळात ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud), सायबर क्राईमच्या (Cyber Crime) संख्येतही मोठी वाढ झाली आहे. OTP, KYC, SIM card अशा अनेक कारणांनी आतापर्यंत अनेकांची मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे. फसवणुकीचा असाच एक प्रकार मध्यप्रदेशातील रीवामध्ये समोर आला असून केवळ 11 रुपयांच्या नावाने एका डॉक्टरच्या खात्यातून फ्रॉड करणाऱ्यांनी तब्बल 6 लाखांची रक्कम उडवली आहे. SIM कार्ड वेरिफिकेशनच्या (SIM Card Verification) नावाने डॉक्टरला मोठा गंडा घालण्यात आला आहे. सायबर क्रिमिनल्सने एका रिटायर्ड डॉक्टरला निशाणा करुन त्यांची फसवणूक केली आहे. 18 जुलै रोजी फ्रॉड करणाऱ्या फ्रॉडस्टर्सनी डॉक्टरांना कॉल करुन त्यांचं सिम कार्ड वेरिफाय करण्याबाबत सांगितलं. सिम कार्ड वेरिफाय न केल्यास, 24 तासांच्या आत सिम बंद होणार असल्याची खोटी माहिती त्यांना दिली. वेरिफिकेशनच्या नावाखाली स्कॅमर्सनी 11 रुपये नेट बँकिंगद्वारे मागितले. फ्रॉडस्टर्सच्या जाळ्यात अडकून डॉक्टरांनी आपल्या SBI खात्यातून 11 रुपये ट्रान्सफर केले. पैसे ट्रान्सफर केल्याच्या काही वेळातच डॉक्टरांच्या मोबाईलवर एका मागोमाग एक पैसे कट झाल्याचे 15 मेसेज आले. या मेसेजमधून त्यांच्या बँक खात्यातून 6 लाख 423 रुपये उडाल्याचं समजलं.

Mobile Phone चोरी झाल्यास आता सरकारच करणार मदत, करावं लागेल हे एक काम

डॉक्टरांनी बँकेत जाऊन संपूर्ण प्रकाराबाबत माहिती दिली आणि पोलिसांतही तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडित डॉक्टरने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. ज्या नंबरवरुन डॉक्टरांना कॉल आला होता, त्या फोनचं लोकेशन झारखंडमधील असल्याचं समोर आलं. लोकेशननुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

VI युजर्ससाठी कंपनीकडून फ्रॉड अलर्ट; जाणून घ्या यापासून कसा कराल बचाव

आरोपींनाही पोलीस त्यांच्या मागावर असल्याची माहिती मिळताच त्यांनी आपलं लोकेशन बदलण्यास सुरुवात केली. परंतु पोलिसांनी एका ठिकाणी छापेमारी करत स्कॉर्पियो कार ताब्यात घेतली आहे. या गाडीत एक मोबाईल मिळाला असून याच मोबाईलवरुन त्यांनी डॉक्टरांना कॉल केला होता. या मोबाईलमधील सिम कार्डच्या आधारे एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या