JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Mobile Signal Booster: एकच नंबर! मोबाइल फोन बूस्टरच्या मदतीनं आता कुठेही मिळेल स्टाँग सिग्नल

Mobile Signal Booster: एकच नंबर! मोबाइल फोन बूस्टरच्या मदतीनं आता कुठेही मिळेल स्टाँग सिग्नल

Mobile Signal Booster: मोबाईल फोनमध्ये नेटवर्क समस्या सामान्य आहेत. वैयक्तिक वापर असो की ऑफिसचं काम, नेटवर्क नीट नसेल तर खूप त्रास होतो. अशा परिस्थितीत मोबाईल फोन बूस्टर खूप उपयुक्त आहे. नेटवर्क वाढवण्यासाठी फोन बूस्टरचा वापर केला जातो.

जाहिरात

Mobile Signal Booster: एकच नंबर! मोबाइल फोन बूस्टरच्या मदतीनं आता कुठेही मिळेल स्टाँग सिग्नल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 ऑगस्ट: स्मार्टफोन ही काळाची गरज आहे. आता अगदी कॉलेजला जाणाऱ्या मुलांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांकडे स्मार्टफोन आहेत. लवकरच भारतात 5G सेवा लाँच होणार आहेत. त्यानंतर भारतीयांना हायस्पीड इंटरनेटचा लाभ घेता येणार आहे. आजच्या काळात आपण सर्वजण मोबाईल फोन वापरतो, परंतु दुर्दैवानं आजही आपल्या संपूर्ण देशात अनेक ठिकाणी मोबाईल सिग्नलची समस्या कायम आहे. काही ठिकाणी सिग्नल खूप मजबूत आहे, तर काही ठिकाणी तो अजिबात उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत, मोबाइल फोन बूस्टर मोबाइल सिग्नल वाढवून ही समस्या सोडवतो. जेणेकरून लोक खराब कव्हरेज असलेल्या भागातही त्यांचा फोन सामान्यपणे वापरणं सुरू ठेवू शकतात. सेल फोन बूस्टर हे असे उपकरण आहे जे मोबाईल फोनचा सिग्नल वाढवते. हे डिव्हाइसच्या एका ठराविक पातळीपर्यंत कव्हरेज सुधारते. घरी, कार्यालयात किंवा ग्रामीण भागात चांगला सिग्नल मिळवण्यासाठी तुम्ही सेल फोन बूस्टर (Mobile Signal Booster) वापरू शकता. सेल फोन बूस्टर काय आहे? सेल फोन बूस्टर हा बाई-डायरेक्शन अॅम्प्लिफायरचा प्रकार आहे, जो सेल फोन रिसेप्शन सुधारण्यासाठी वापरला जातो. त्याच्या कार्यपद्धतीबद्दल बोलायचं झाल्यास, त्यात सामान्यत: डोनर अँटेना असतो, जो जवळच्या सेल टॉवर्स, कोएक्सियल केबल्स, सिग्नल अॅम्प्लिफायर आणि इनडोअर रीब्रॉडकास्ट अँटेना वरून सिग्नल घेतो आणि बूस्टिंगद्वारे प्रसारित करतो. हेही वाचा-  Best 5G Phones In India: 20 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतात ‘हे’ 5 सर्वोत्तम 5G स्मार्टफोन, फिचर्सही दमदार सिग्नलला करतो बूस्ट: हे तुमच्या वायफाय राउटरचा सिग्नल देखील त्याच प्रकारे वाढवतं आणि वायफायचा वेग वाढवतं. हे लक्षात घेणं देखील महत्त्वाचं आहे की सेल फोन बूस्टर फक्त आधीच उपलब्ध असलेले सिग्नल वाढवतात. एखाद्या भागात नेटवर्कसाठी कोणतेही कव्हरेज नसल्यास, हे डिव्हाइस तेथे कार्य करणार नाही. जर सिग्नल कमी किंवा खूप कमकुवत असेल तर या उपकरणातून चांगला सिग्नल मिळण्याची शक्यता असते. अशा प्रकारे मोबाईल फोन बूस्टर सिग्नल वाढवण्यास मदत करतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या