नवी दिल्ली, 4 डिसेंबर : प्रोफेशनल नेटवर्क लिंक्डइन (LinkedIn) आता हिंदीमध्येही उपलब्ध आहे. लिंक्डइनवर हिंदी (Hindi LinkedIn) पहिली भारतीय प्रादेशिक भाषा आहे. आता युजर्स आपल्या डेस्कटॉप आणि अँड्रॉइड आणि iOS फोनवर हिंदी कंटेंट बनवता येईल. सध्या हे केवळ डेस्कटॉप आणि अँड्रॉइडसाठी लाँच केलं आहे. LinkedIn ची पुढील योजना हिंदी भाषिक लोकांसाठी विविध उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी वाढवण्याच्या दिशेने काम करणं आहे. यात बँकिंग आणि सरकारी नोकऱ्यांचाही समावेश आहे. लिंक्डइनचे इंडिया कंट्री मॅनेजर आशुतोष गुप्ता यांनी सांगितलं, की भारतात साथीच्या रोगाचा सामना करताना आणि नवीन काळातील कामकाजाच्या वातावरणात लोकांना कनेक्ट होण्यासाठी, शिकण्यासाठी, पुढे जाण्यासाठी आणि जॉब मिळवून देण्यासाठी LinkedIn ने महत्त्वपूर्ण मोहिम सुरू केली आहे. LinkedIn वर हिंदी भाषा सुरू केल्याने अधिक सदस्य प्लॅटफॉर्मवर कंटेंट, जॉब आणि नेटवर्किंगचा लाभ घेऊ शकतात. युजर यामुळे सोप्या, सोयीस्कर भाषेत व्यक्त होऊ शकतात.
हिंदीमध्ये तुमचं LinkedIn प्रोफाइल कसं सेट कराल? लिंक्डइनचं मोबाइल अॅप्लिकेशन हिंदीमध्ये पाहण्यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जा. इथे हिंदी भाषेचा पर्याय निवडा. ज्या स्मार्टफोन युजर्सने आपल्या फोनमध्ये आधीच डिव्हाइसचं Preferred Languages हिंदी म्हणून निवडलं असेल, त्यांना लिंक्डइन हिंदीमध्येच वापरता येईल.
Desktop वर सर्वात आधी लिंक्डइनच्या Homepage वर टॉपवर Me आयकॉनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर Setting & Privacy सिलेक्ट करा. त्यानंतर Account Preference वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर Site Preference सिलेक्ट करावं लागेल. भाषेच्या बाजूला Change वर क्लिक करावं लागेल आणि ड्रॉप डाउन लिस्टमध्ये हिंदीचा पर्याय निवडावा लागेल.