JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / दोन सेल्फी कॅमेरा असणारा बजेट स्मार्टफोन भारतात लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

दोन सेल्फी कॅमेरा असणारा बजेट स्मार्टफोन भारतात लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

या फोनमध्ये एकूण 4 रियर आणि 2 सेल्फी असे 6 कॅमेरे मिळतात. 16 जानेवारीपासून Flipkart सह संपूर्ण भारतात ऑफलाईन रिटेल आउटलेट्सवर सुरू होणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 14 जानेवारी : स्मार्टफोन ब्रँड Tecno ने धमाकेदार अंदाजात 2021 ची सुरुवात केली आहे. Tecno ने आपल्या लोकप्रिय कॅमेरा-सेंट्रिक कॅमोन स्मार्टफोन सीरीजनंतर आता, टेक्नो कॅमोन 16 प्रीमियर आणला आहे. प्रीमियम कॅमेरा क्षमतांसह असणारा हा फोन आपल्या श्रेणीमध्ये गेम चेंजर मानला जात आहे. Tecno Camon 16 - Tecno Camon 16 या स्मार्टफोनची किंमत 16,999 रुपये इतकी आहे. Tecno Camon 16 प्रीमियर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह ग्लेशियर सिल्वर रंगात उपलब्ध आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, याची विक्री 16 जानेवारीपासून Flipkart सह संपूर्ण भारतात ऑफलाईन रिटेल आउटलेट्सवर सुरू होणार आहे.

Freedom 251 मोबाईल मॅन पुन्हा चर्चेत; आता 200 कोटींच्या ड्रायफ्रूट घोटाळ्यात अटक

Tecno Camon 16 कॅमेरा - गेल्या वर्षी आलेल्या Tecno Camon स्मार्टफोनने हायर कॅमेरा पिक्सल, प्रीमियम AI पावर्ड अल्ट्रा नाईट लेन्स आणि पॉप-अप कॅमेराची सुरुवात केली होती. आता Tecno Camon 16 प्रीमीयरने प्रीमियम स्मार्टफोन Videography मध्ये ट्रांजिशनची सुरुवात केली आहे. यात 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड, 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सल लो-लाईट सेन्सर देण्यात आला आहे. तसंच 48 मेगापिक्सल + 8 मेगापिक्सल डुअल फ्रंट सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. म्हणजेच या फोनमध्ये एकूण 4 रियर आणि 2 सेल्फी असे 6 कॅमेरे मिळतात.

Xiaomiच्या या फोनचा रेकॉर्डब्रेक सेल;पहिल्याच दिवशी 200 कोटी स्मार्टफोनची विक्री

हा फोन जगातील सर्वात खास ट्रेडमार्क टायवोस (टेक्नो एआय विजन ऑप्टिमाइजेशन सॉल्यूशन) द्वारा सोनी आयएमएक्स 686 आरजीबी सेन्सर आणि सुपर नाईट 2.0 ला सपोर्ट करतो. या फोनला 64 मेगापिक्सल सेन्सर 119 डिग्री सुपर वाईड फोटो आणि मॅक्रो शॉट्ससाठी 8 मेगापिक्सल लेन्स, अंधारात व्हिडीओ शूट करण्यासाठी 2 मेगापिक्सल पोलर नाईट वीडियो सेन्सर आणि 2 मेगापिक्सल बोकेह लेन्स देण्यात आली आहे. Tecno Camon 16 फोनला 4500mAh बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. 6.9 इंची फुल HD+ डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो G90T प्रोसेसर देण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या