नवी दिल्ली, 9 मार्च : सध्या स्मार्टफोन युजर्सच्या संख्येत मोठी वाढ होत, तर दुसरीकडे स्मार्टफोनवर डेटाचा वापर करण्यासाठी कंपन्या एका पेक्षा एक डेटा प्लॅन्स ऑफर करत आहेत. तसंच कंपन्या आपल्या नेटवर्कला मजबूत करण्यासाठी अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत. अधिकतर कंपन्या आपल्या स्मार्टफोनला 4G VoLTE सपोर्टसह लाँच करत आहेत. परंतु तरीही काही ठिकाणी नेटवर्कची समस्या वाढते आहे, त्यामुळे इंटरनेट स्पीडमध्ये काम करत नाही. अनेकांना इंटरनेट स्पीडची समस्या येत असल्याचं चित्र आहे. परंतु काही सोप्या स्टेप्सनी फोनचा इंटरनेट स्पीड वाढवण्यास मदत होऊ शकते. अशाप्रकारे वाढवा 4G नेटवर्क स्पीड - - फोनच्या सेटिंग्जमध्ये जा. - त्यानंतर नेटवर्क सेटिंग्ज पर्यायावर क्लिक करा
- येथे प्रीफर्ड टाईप ऑफ नेटवर्क या पर्यायावर जावून 4G किंवा LTE सिलेक्ट करा. - तसंच नेटवर्क सेटिंग्जमध्ये एक्सेस पॉइंट नेटवर्क (APN) सेटिंग चेक करावी लागेल. जर योग्य APN निवडला नाही, तर APN पर्यायात सेटिंग्जला डिफॉल्ट सेट करावं लागेल.
दरम्यान, फोनमध्ये असलेले Apps देखील इंटरनेट स्पीड कमी करतात. अनेकदा Apps बॅकग्राउंडमध्ये सुरू असतात आणि डेटाही खर्च होत राहतो. डेटाचा वापर कमी करण्यासाठी व्हिडीओजचा ऑटो प्ले मोड बंद करा. तसंच Apps मध्ये मीडिया फाईल्सचं ऑटो डाउनलोडही बंद करा.