JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / भारतात Tiktok चं comeback होणार? या नावाने कंपनी करणार रिएन्ट्री

भारतात Tiktok चं comeback होणार? या नावाने कंपनी करणार रिएन्ट्री

Tiktok लवकरच भारतात पुन्हा एन्ट्री करू शकतं, अशी माहिती आहे. टिकटॉकची मूळ कंपनी बाइटडान्सने (ByteDance) पेटेंट, डिझाईन आणि ट्रेड मार्क्स कंट्रोलर जनरलसह शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅपसाठी एक ट्रेडमार्क दाखल केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 जुलै: भारतात मागील वर्षी अनेक चिनी अ‍ॅप्स (Chinese Apps) बॅन करण्यात आले. त्यापैकी अतिशय लोकप्रिय टिकटॉक अ‍ॅपवरही (Tiktok App Ban) भारत सरकारने बंदी आणली. बॅननंतर हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवरुनही (Google Play Store) हटवण्यात आलं आणि भारतीय नेटवर्कवर हे अनअ‍ॅक्सेसिबल झालं. भारतात टिकटॉकचे अनेक चाहते आहेत. टिकटॉक बॅन झाल्यानंतर अनेकांनी याबाबत नाराजीही व्यक्त केली होती. परंतु आता टिकटॉक फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. Tiktok लवकरच भारतात पुन्हा एन्ट्री करू शकतं, अशी माहिती आहे. टिकटॉकची मूळ कंपनी बाइटडान्सने (ByteDance) पेटेंट, डिझाईन आणि ट्रेड मार्क्स कंट्रोलर जनरलसह शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅपसाठी एक ट्रेडमार्क दाखल केला आहे.

(वाचा -  Online Railway Ticket बुक करताना येतेय समस्या? घरबसल्या काही सेकंदात करा बुकिंग )

बाइटडान्सने 6 जुलै रोजी टिकटॉकसाठी TickTock या नव्या टायटलसह ट्रेडमार्क दाखल केला आहे. ट्विटरवर टिपस्टर मुकुल शर्मा यांच्याद्वारे हे रिपोर्ट करण्यात आलं. मीडिया रिपोर्टनुसार, टिकटॉक देशात पुन्हा आणण्यासाठी बाइटडान्स सरकारशी चर्चा करत आहे. भारतातील नव्या आयटी नियमांचं पालन करण्यासाठी काम करणार असल्याचं आश्वासनही चिनी कंपनीने भारतीय अधिकाऱ्यांना दिलं आहे.

(वाचा -  ना कॅश ना कार्ड, आता केवळ FASTag नेच भरता येणार पेट्रोल, वाचा काय आहे प्रोसेस )

भारत आणि चीनमधील तणावादरम्याम मागील वर्षी सार्वभौमत्व आणि सुरक्षेच्या दृष्टीने बाइटडान्सची मालकी असलेलं टिकटॉक बॅन करण्यात आलं. देशात त्यावेळी टिकटॉकचे जवळपास 20 कोटी युजर्स होते. शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्मच्या (Short Video) माध्यमातून टिकटॉक आकर्षण ठरलं होतं. टिकटॉक बॅन झाल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाउनदरम्यान शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्मच्या मागणीत वाढ झाल्यानंतर टिकटॉकला काही पर्यायी भारतीय अ‍ॅप्सदेखील भारतीय बाजारात उदयास आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या