JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / 5G नेटवर्क आरोग्यासाठी किती धोकादायक? वाचा काय आहे जाणकारांचं म्हणणं

5G नेटवर्क आरोग्यासाठी किती धोकादायक? वाचा काय आहे जाणकारांचं म्हणणं

5G नेटवर्क आणि याच्या रेडिएशनचा आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो?

जाहिरात

संग्रहित फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 4 मार्च : जगभरात रोज विकसित होणाऱ्या नव-नव्या टेक्नोलॉजीमुळे लोकांची जीवनशैली बदलत आहे. कम्युनिकेशन क्षेत्रातील तंत्रज्ञानात मोठी प्रगती होत असून अनेक मोठ्या कंपन्या 5G नेटवर्कच्या तयारीमध्ये मोठा पैसा गुंतवत आहेत. एकीकडे कंपन्या 5G नेटवर्कवर काम करत असन दुसरीकडे जाणकारांनी, या तंत्रज्ञानामुळे मानव स्वत:चं आपल्या जीवनात धोका निर्माण करत असल्याचं म्हटलं आहे. 5G नेटवर्क आणि याच्या रेडिएशनचा आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो? मोबाईल आणि कंम्युटरमध्ये 4G नेटवर्कचा वापर करणारे युजर्स आता 5G नेटवर्क येण्याची वाट पाहत आहेत. 5G नेटवर्कची सुविधा सुरू झाल्यानंतर मोबाईलचा इंटरनेट स्पीड 100 पटींनी वाढणार असल्याचं बोललं जात आहे. 5G नेटवर्क येण्यापूर्वीच अनेक स्मार्टफोन निर्माता कंपन्यांनी 5G नेटवर्क सपोर्ट करणारे फोन बाजारात लाँच केले आहेत.

भारतात 5G नेटवर्कच्या ट्रायलला मंजुरी; ‘या’ कंपन्या करणार टेस्टिंग, चायनीज कंपन्यांना No Entry

5G नेटवर्कचा आरोग्यावर परिणाम? देशात 5G नेटवर्क सुरु होताच मोबाईल टॉवर्सच्या संख्येत मोठी वाढ होईल. ज्याद्वारे आरएफ सिग्नलही (RF Signal) मोठ्या प्रमाणात तयार होतील. त्यामुळे टॉवर्समधून निघणाऱ्या या रडिएशनमुळे आरोग्यावर मोठा परिणाम होईल असं बोललं जात आहे. मात्र जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाद्वारे (TRAI) तयार करण्यात आलेल्या सुरक्षा उपायांचं पालन योग्यरित्या केल्यास 5G नेटवर्कमधून निघणाऱ्या रेडिएशनचा लोकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही (World Health Organization) 5G नेटवर्कमुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होणार नसल्याचं म्हटलं आहे. रेडिओ फ्रिक्वेंसीमुळे लोकांच्या केवळ शरीराच्या तापमानात वाढ होण्याव्यतिरिक्त इतर नुकसान होणार नसल्याचं सांगितलं आहे.

Explainer: 5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का? काय आहेत तथ्यं? जाणून घ्या

काही जाणकारांचं असं म्हणणं आहे, की व्यक्तीच्या शरीरासाठी आयोनायजिंग फ्रिक्वेंसी (Ionizing radiation) नुकसानकारक आहे. परंतु मोबाईलमधून नॉन-आयोनायजिंग फ्रिक्वेंसीचा प्रवाह असतो. तसंच 5G रेडिएशनमुळे आतापर्यंत आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा कोणताही डेटा समोर आला नसल्याचंही जाणकारांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या