JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / बंपर ऑफर! 36 हजारहून अधिक डिस्काउंटमध्ये खरेदी करता येईल iPhone 13; पाहा काय आहे डील

बंपर ऑफर! 36 हजारहून अधिक डिस्काउंटमध्ये खरेदी करता येईल iPhone 13; पाहा काय आहे डील

Apple चा लेटेस्ट स्मार्टफोन iPhone 13 महाग आहे, पण एका खास ऑफरमध्ये तो स्वस्तात खरेदी करता येईल. इलेक्ट्रॉनिक स्टोर Croma ने iPhone 13 वर ऑफर दिली असून यात 36 हजार रुपयांहून अधिक सूट देण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 1 एप्रिल : अनेकांची iPhone घेण्याची इच्छा असते पण हा प्रीमियम फोन अतिशय महाग असल्याने तो परवडणारा नसतो. अनेकांची इच्छा असूनही तो घेता येत नाही. पण तुम्ही आता iPhone घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. Apple चा लेटेस्ट स्मार्टफोन iPhone 13 महाग आहे, पण एका खास ऑफरमध्ये तो स्वस्तात खरेदी करता येईल. इलेक्ट्रॉनिक स्टोर Croma ने iPhone 13 वर ऑफर दिली असून यात 36 हजार रुपयांहून अधिक सूट देण्यात आली आहे. ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart आणि Amazon वरही iPhone वर मोठी सूट असते. पण iPhone 13 तुम्ही Croma मधून खरेदी केल्यास चांगली सूट मिळू शकते. 128GB वेरिएंट iPhone 13 ची मार्केटमधील किंमत 79,900 रुपये आहे. परंतु हा फोन क्रोमामध्ये 5910 रुपयांच्या डिस्काउंटमध्ये खरेदी करता येईल. यात फोनची किंमत 73,990 रुपये होईल. त्याशिवाय ICICI Bank, Kotak Bank किंवा SBI Bank च्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास आणखी 6 हजार रुपयांची सूट मिळेल. अशाप्रकारे एकूण 11,910 रुपये डिस्काउंटनंतर iPhone 13 तुम्ही 67,990 रुपयांत खरेदी करता येईल.

हे वाचा -  OnePlus चा ‘हा’ स्मार्टफोन आज होणार लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

जबरदस्त एक्सचेंज ऑफर - वरील दोन ऑफरशिवाय iPhone 13 वर Croma मध्ये एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. कोणत्याही स्मार्टफोनच्या बदल्यात तुम्ही iPhone 13 घेऊ शकता. परंतु एक्सचेंज ऑफर प्रत्येक फोनच्या मॉडेल तसंच कंडिशनवर अवलंबून असते. जर तुम्ही एक वर्ष जुना 128GB iPhone 12 एक्सचेंज केला तर तुम्हाला 24500 रुपयांची सूट मिळेल. या एक्सचेंज ऑफरमुळे iPhone 13 ची किंमत 67,990 रुपयांवरुन 43,490 रुपये होईल. संपूर्ण एक्सचेंज ऑफर, बँक ऑपर आणि प्रो़डक्ड डिस्काउंटसह नव्या iPhone 13 वर 36,410 रुपयांची सूट मिळवू शकता.

हे वाचा -  108 MP कॅमेरासह Samsung Galaxy A73 5G भारतात लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स

काय आहेत 128GB iPhone 13 फीचर्स - - 6.1 इंची सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले - A15 बायोनिक चिप - फ्रंट कॅमरा 12MP - रियर अल्ट्रा-वाइड कॅमेरा 12MP आहे. तसंच वाइड टेलीफोटो कॅमरा, नाइट मोड आणि स्मार्ट HDR 4 सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या