नवी दिल्ली, 11 जुलै : WhatsApp कडून नेहमीच आपल्या युजर्ससाठी विविध अपडेट, नवे फीचर्स लाँच केले जातात. आता व्हॉट्सअॅपने आपल्या iOS बीटा युजर्ससाठी नवं अपडेट आणलं असून जे चॅटिंग अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी फायदेशीर ठरेल. नव्या अपडेटमध्ये जे iOS युजर्स व्हॉट्सअॅप बीटाचा वापर करतात, ते चॅट ओपन न करताच नोटिफिकेशनमध्येच संपूर्ण चॅट पाहू शकतात. युजर्सचे मेसेज पाहण्यासह ते रीड करण्याचाही पर्याय यात आहे. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला रिसिव्हरने मेसेज रीड केला की नाही याबाबत माहिती मिळणार नाही. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप हे फीचर iOS युजर्ससाठी 2.21.140.9 वर्जनमध्ये रोलआउट करणार आहे. हे बीटा अपडेट अॅपमध्येच Interact करण्यासाठी एक नवं फीचर आहे. युजर्स चॅट कंटेंट पाहण्यासाठी नोटिफिकेशनला एक्सपेंड करू शकतात. युजर्स एका चॅटमध्ये जुने मेसेज वाचण्यासाठी स्क्रॉलही करू शकतात.
युजर चॅट प्रिव्ह्यू पाहू शकतात. चॅट रीड केल्यानंतरही ब्लू टीक येणार नाही. रीड रिसिप्ट ऑन असल्यासही यात ब्लू टीक दिसणार नाही. जर युजरने नोटिफिकेशनमध्येच मेसेजचा रिप्लाय केल्यास सर्व ग्रे टीक ब्लूमध्ये दिसतील.
दरम्यान, WhatsApp च्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत (Privacy Policy) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. व्हॉट्सअॅपने दिल्ली हाय कोर्टात त्यांनी नवी प्रायव्हसी पॉलिसी सध्या स्वेच्छिक केली असल्याचं सांगितलं आहे. जोपर्यंत डेटा प्रोटेक्शन बिल लागू होत नाही, तोपर्यंत प्रायव्हसी पॉलिसी स्वेच्छिक राहील. व्हॉट्सअॅप नवी प्रायव्हसी पॉलिसी सध्या लागू करणार नाही. याचा अर्थ प्रायव्हसी पॉलिसी अॅक्सेप्ट न केल्यासही युजरला ज्या सुविधांचा लाभ मिळतो आहे, तो सुरूच राहणार आहे. यावर कोणत्याही मर्यादा घालण्यात येणार नाहीत, असं व्हॉट्सअॅपकडून सांगण्यात आलं आहे.