JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Instagram चा मोठा निर्णय, बंद होणार पॉप्युलर IGTV App फीचर

Instagram चा मोठा निर्णय, बंद होणार पॉप्युलर IGTV App फीचर

कंपनीनं आपलं इन्स्टाग्राम टीव्ही (IGTV) हे स्वतंत्र अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी मुख्य इन्स्टाग्राम अ‍ॅपवरच सर्व व्हिडीओ ठेवण्यास प्राधान्य दिलं जाणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 2 मार्च : फोटो शेअरिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) असलेल्या ‘इन्स्टाग्राम’ची (Instagram) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. मेटाच्या (Meta) मालकीचा असलेला हा प्लॅटफॉर्म आपल्या युजर्सना सतत काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतो. नवनवीन फीचर्स देऊन युजर्सना अधिक चांगला एक्सपिरियन्स देण्यास सतत प्रयत्नशील असणाऱ्या इन्स्टाग्रामनं आता मात्र, एक पाऊल मागे घेतलं आहे. कंपनीनं आपलं इन्स्टाग्राम टीव्ही (IGTV) हे स्वतंत्र अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी मुख्य इन्स्टाग्राम अ‍ॅपवरच सर्व व्हिडीओ ठेवण्यास प्राधान्य दिलं जाणार आहे. यूट्यूबला (YouTube) टक्कर देण्यासाठी इन्स्टाग्रामनं 2018 मध्ये IGTV अ‍ॅप लाँच केलं होतं. या अ‍ॅपच्या माध्यमातून कंपनीला अपेक्षित असलेली लोकप्रियता मिळवता आली नाही. त्यामुळे कंपनीनं हा लाँग व्हिडीओ प्लॅटफॉर्म (Long Video Platform) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामनं आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘व्हिडीओ शोधणं आणि तयार करणं शक्य तितकं सोपं करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कंपनी IGTV हे स्टँडअलोन अ‍ॅप बंद करत आहे.’ या ब्लॉग पोस्टमध्ये असंही म्हटलं आहे की, मुख्य अ‍ॅपमध्ये टॅप-टू-म्यूटसह फुल-स्क्रीन व्ह्युअरचा (Full-screen Viewer) ऑप्शन दिला जाईल. याशिवाय कंपनी व्हिडीओ पाहणं आणि शेअर करणं अधिक सोपं करण्यासाठीदेखील प्रयत्नशील आहे. रील्समध्ये जाहिराती आणण्यासाठी इन्स्टाग्राम एका नवीन फीचरचं टेस्टिंगसुद्धा करत आहे. इन्स्टाग्रामची पेरेंट कंपनी असलेल्या मेटानंही IGTV अ‍ॅप बंद केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मेटानं TechCrunch या टेक ई-पेपरद्वारे याची घोषणा केली आहे. त्यामुळे मार्च महिन्यातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात IGTV अ‍ॅप पूर्णपणे बंद होईल.

हे वाचा -  WhatsApp ची मोठी कारवाई, जानेवारीत 18.58 लाख भारतीय अकाउंट बॅन; कारणाचाही खुलासा

IGTV अ‍ॅप 2018 मध्ये लाँच करण्यात आलं होतं आणि ते व्हर्टिकल व्हिडिओंसाठी यूट्यूबसोबत स्पर्धा करणार होतं. इन्स्टाग्राम अ‍ॅपमध्ये एक IGTV बटणही (IGTV Button) देण्यात आलं होतं. हे बटण युजर्सना इन्स्टाग्रामवरून IGTV अ‍ॅपवर घेऊन जात होतं. फार कमी लोक याचा वापर करतात, असं कारणं देऊन इन्स्टाग्रामनं 2020 मध्ये हे बटण काढून टाकलं होतं. गेल्यावर्षी (2021) कंपनीनं IGTV चं नाव बदलून ‘इन्स्टाग्राम टीव्ही’ (Instagram TV) असं केलं. कंपनीनं असंही स्पष्ट दिलं होतं की, IGTV या फीचरअंतर्गत एक तासाचा व्हिडीओ अपलोड करण्याची सध्याची सुविधा कमी करून सामान्य व्हिडीओ अपलोड करण्याची परवानगीही आता देण्यात येणार आहे. IGTV अ‍ॅड्स (IGTV Ads) म्हणून ओळखल्या जाणार्‍या जाहिराती, ज्या एका मिनिटापेक्षा जास्त लांबीच्या व्हिडिओंच्या माध्यामातून टाकल्या गेल्या होत्या त्यादेखील इन्स्टाग्रामवरून काढून टाकल्या गेल्या आहेत. कंपनीनं म्हटलं आहे की, व्हिडीओंवर जास्त लक्ष केंद्रित करण्याचा त्यांचा मानस आहे. इन्स्टाग्राम हे आता फक्त फोटो शेअरिंग अ‍ॅप (Photo-sharing App) नसल्याचं कंपनीनं गेल्यावर्षीच स्पष्ट केलं होतं.

हे वाचा -  Driving License शिवाय चालवता येईल वाहन, ट्रॅफिक पोलीस कापू शकत नाही चालान

आपल्या घोषणेमध्ये कंपनीनं सांगितलं की, इन्स्टाग्रामनं शॉर्ट व्हिडीओज आणि रील्सवर आपलं जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं आहे. अ‍ॅपवरील एंगेजमेंट ग्रोथसाठी (Engagement Growth), रील्स सर्वात जास्त योगदान (Largest Contributor) देणारा घटक ठरेल. त्यामुळे कंपनीनं रील्समध्ये जास्त गुंतवणूक सुरू ठेवण्याचा विचार केला आहे. ‘रील्स (Instagram Reels) हा इन्स्टाग्रामचा विकसित होणारा आणि महत्त्वाचा भाग आहे आणि आम्ही या फॉरमॅटमध्ये आणखी गुंतवणूक करण्यास उत्सुक आहोत, असं इन्स्टाग्रामनं आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या