JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / आधी Facebook नंतर WhatsApp अन् आता Instagram डाउन; झुकरबर्गच्या मेटाला झालंय काय?

आधी Facebook नंतर WhatsApp अन् आता Instagram डाउन; झुकरबर्गच्या मेटाला झालंय काय?

Instagram Down: अनेकांची इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड होत आहेत. ट्विटरवर अनेक वापरकर्ते त्यांचे खाते सस्पेंड झाल्याचे स्क्रीनशॉट शेअर करत आहेत.

जाहिरात

Instagram Down: अनेकांची इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड होत आहेत.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 ऑक्टोबर : काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया प्लटफॉर्म फेसबुकचे फोलोअर्स अचानक कमी झाले होते. आता इन्स्टाग्रामचे अनेक युजर्स अकाउंट सस्पेंड झाल्याची तक्रार करत आहेत. काही युजर्स इन्स्टामध्ये लॉगइन करू शकत नसल्याने संतापले आहेत. अकाउंट सस्पेंड झाल्यामुळे अनेकजण नाराज झाले असून, ट्विटरवर याबाबत तक्रार करत आहेत. अलीकडे व्हॉट्सअ‍ॅपही दोन तास डाऊन होते. मात्र, नेहमीप्रमाणे यावेळीही फेसबुकने व्हॉट्सअ‍ॅप बंद करण्यामागचे खरे कारण सांगितले नाही. युजर्सची खाती का होतायेत सस्पेंड? ज्या युजर्सचे इन्स्टा प्रोफाइल सस्पेंड केले जात आहेत त्यांना कोणतेही कारण सांगितले गेले नाही. हे कंपनीकडून होत आहे की इन्स्टा हॅक झालं आहे हे स्पष्ट झालेले नाही. सहसा अशी समस्या जेव्हा एखाद्या कंपनीच्या सर्व्हरवर सायबर हल्ला होतो तेव्हा उद्भवते. कारण एकदा ट्विटरसोबत असे घडले होते. अनेक मोठी खाती हॅक झाली होती, नंतर असे आढळून आले की हॅकरने ट्विटरचा बॅकएंड ऍक्सेस घेतला होता. इंस्टाग्रामच्या या मुद्द्यावर कंपनीने ट्विट करून कंपनी दुरुस्त करत असल्याचे सांगितले आहे. यावेळी देखील समस्या कुठे आहे आणि युजर्सची खाती स्वतःहून का सस्पेंड केली जात आहेत हे सांगण्यात आले नाही. साधारणपणे, इंस्टाग्राम खाती निलंबित करण्यामागे एक कारण असते. कंपनीच्या कम्यूनिटी गाइडलाइन्सचं उल्लंघन केल्यास युजर्सची खाती निलंबित केली जातात. मात्र, सध्या काहीही न करता, अनेक वापरकर्त्यांची खाती निलंबित करण्यात आल्याने युजर्स गोंधळले आहेत. वाचा - फेसबुकला ब्लू टिक मिळवण्यासाठी सेलिब्रेटी असण्याची गरज नाही, फक्त या सोप्या स्टेप्स फॉलो करा डाउनडिटेक्टरच्या मते, लोकांनी संध्याकाळी 6.35 पासून इंस्टाग्राम डाउन रिपोर्ट करण्यास सुरुवात केली. हा आलेख सध्या खाली येत असल्याचे दिसत आहे. म्हणजेच आता इंस्टाग्राम काही युजर्ससाठी काम करत आहे.

फॉलोअर्सही होतायेत कमी सध्या अनेक यूजर्स तक्रार करत आहेत की त्यांचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स अचानक कमी होत आहेत. त्यांचे 10 हजार फॉलोअर्स अचानक कमी झाल्याची तक्रार अनेक युजर्सनी केली आहे. यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. काही बगमुळे हे होऊ शकते. ट्विटरवर ट्रेंडिंग हॅशटॅग My Instagram आणि Instagram Down हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहेत. माय इंस्टाग्राम हॅशटॅगवरून यूजर्स सांगत आहेत की त्यांचे अकाउंट कसे सस्पेंड होत आहे. इंस्टाग्राम डाउनवरील युजर्स सांगत आहेत की त्यांचे अ‍ॅप पुन्हा पुन्हा क्रॅश होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या