JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Oppo आणि Xiaomi ग्रुपविरोधात आयकर विभागाची मोठी कारवाई, अधिकाऱ्यांकडून अनेक ठिकाणी छापेमारी

Oppo आणि Xiaomi ग्रुपविरोधात आयकर विभागाची मोठी कारवाई, अधिकाऱ्यांकडून अनेक ठिकाणी छापेमारी

आयकर विभागाने चीनी मोबाइल कंपनी ओप्पो ग्रुप (Oppo Group) आणि शाओमी ग्रुपविरोधात (Xiaomi Group) मोठी कारवाई केली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 डिसेंबर : आयकर विभागाने चीनी मोबाइल कंपनी ओप्पो ग्रुप (Oppo Group) आणि शाओमी ग्रुपविरोधात (Xiaomi Group) मोठी कारवाई केली आहे. आयकर विभागाने अनेक वरिष्ठ अधिकारी, संचालक, CFO सह इतर अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, दिल्ली-एनसीआर, गुडगावमध्ये छापेमारी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील अनेक ठिकाणी Oppo ग्रुपच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते.

UPI Payment करताना राहा अलर्ट, छोटी चूकही रिकामं करेल तुमचं बँक अकाउंट

बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी नेपाळनेही अनेक चिनी कंपन्यांना ब्लॅकलिस्ट केलं आहे. त्याशिवाय अमेरिकेने नोव्हेंबरमध्ये चीनच्या जवळपास 13 कंपन्यांवर बॅन घातला आहे. या कंपन्यांना अमेरिकी व्यवसाय करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात आलं आहे.

Google वर चुकूनही Search करू नका या 5 गोष्टी, खावी लागू शकते जेलची हवा

एका रिपोर्टनुसार, भारतात स्मार्टफोन मार्केट जवळपास 2.5 लाख कोटी रुपयांचं आहे. यात 70 टक्के भागीदारी चिनी कंपन्यांच्या प्रोडक्टची आहे. त्याशिवाय भारतात टेलिव्हीजन मार्केटही जवळपास 30000 कोटी रुपयांचं आहे. यात चिनी कंपन्यांच्या स्मार्ट टीव्हीची भागीदारी जवळपास 45 टक्के आहे. नॉन स्मार्ट टीव्हीची भागीदारी जवळपास 10 टक्के आहे.

भारतविरोधी अजेंडावर सरकारची कठोर भूमिका, 2 वेबसाइट आणि 20 YouTube चॅनेल ब्लॉक

केंद्र सरकारकडून संसदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या 80 चिनी कंपन्या देशात सक्रियपणे व्यवसाय करत आहेत. भारतात 92 चीनी कंपन्या नोंदणीकृत आहेत. त्यापैकी 80 कंपन्या सक्रियपणे व्यवसाय करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या