JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Paytm मधून चुकून दुसऱ्यालाच पैसे झाले ट्रान्सफर? जाणून घ्या कसे मिळवाल परत

Paytm मधून चुकून दुसऱ्यालाच पैसे झाले ट्रान्सफर? जाणून घ्या कसे मिळवाल परत

ज्याला पैसे पाठवायचे नसतात, त्या नंबरवर चुकून पैसे पाठवले जातात. पण त्यानंतर मात्र ते पैसे पुन्हा कसे मिळतील, अशी मोठी समस्या निर्माण होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 मे : अनेकदा आपण चुकून एखाद्या चुकीच्या नंबरवर पैसे ट्रान्सफर करतो. ज्याला पैसे पाठवायचे नसतात, त्या नंबरवर चुकून पैसे पाठवले जातात. पण त्यानंतर मात्र ते पैसे पुन्हा कसे मिळतील, अशी मोठी समस्या निर्माण होते. परंतु एक अशी ट्रिक आहे, ज्याद्वारे Paytm मधून जर एखाद्या चुकीच्या नंबरवर पैसे गेले, तर ते परत मिळवता येतील. Paytm ने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला चुकून पैसे पाठवले, तर तुम्ही त्या व्यक्तीशी बोलून पैसे परत मागू शकता. जर चुकून पैसे पाठवलेली एखादी कंपनी असेल, तर तुम्ही त्या कंपनीशी बोलून Paytm द्वारा पाठवलेल्या ट्रान्झेक्शनचा पुरावा दाखवू शकता. जर एखाद्या व्यक्तीच्या खात्यात पैसे चुकून ट्रान्सफर झाले असतील, तर तुम्ही त्या बँकेशी संपर्क करुन, त्या व्यक्तीची माहिती मिळवू शकता, ज्याच्या खात्यात पैसे गेले आहेत.

(वाचा -  कोणी दुसरा व्यक्ती तुमच्या Aadhaar Card चा वापर तर करत नाही ना? असं ओळखा )

त्या व्यक्तीची माहिती न मिळाल्यास, Paytm कस्टमर केअरमध्ये याची तक्रार दाखल करुन त्या व्यक्तीची माहिती मिळवू शकता. जर संपर्क केल्यानंतरही तो व्यक्ती पैसे देण्यास नकार देत असेल, तर ट्रान्झेक्शनच्या सर्व पुराव्यांसह कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

(वाचा -  बाजूच्या व्यक्तीलाही कळणार नाही तुम्ही WhatsAppवर काय बोलताय!असं लपवा पर्सनल चॅट )

पेटीएमने दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्या व्यक्तीने चुकून दुसऱ्यालाच काही रक्कम पाठवली, तर पेटीएम स्वत:कडून हे पैसे परत करू शकत नाही. निमयांनुसार, कोणत्याही व्यक्तीच्या खात्यातून पैसे, त्याच्या परवानगीशिवाय काढता येत नाहीत. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या खात्यात चुकून पैसे गेले आहेत, त्यातून पैसे काढण्यासाठी त्या व्यक्तीची परवानगी आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या