JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / तुमचं Facebook Account वापरात नसेल तर तुमच्या डेटाचं काय होईल? वाचा अकाउंट डिलीट आणि डिअ‍ॅक्टिवेटमधील फरक

तुमचं Facebook Account वापरात नसेल तर तुमच्या डेटाचं काय होईल? वाचा अकाउंट डिलीट आणि डिअ‍ॅक्टिवेटमधील फरक

फेसबुक अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेट (Facebook Account Deactivation) करायचं की डिलीट करायचं, यात अनेकांचा गोंधळ होतो. फेसबुक अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेशन आणि फेसबुक अकाउंट डिलीट (Facebook Account Delete) करणं यांमधला फरक जाणून घ्या.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : फेसबुक हा आजच्या काळातल्या बहुतांश जणांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे, ही गोष्ट नाकारता येत नाही. सोशल मीडियाचा अतिरेकी वापर होऊ लागल्यानंतर काही दुष्परिणामही दिसू लागले. त्यामुळे अलीकडच्या काळात डिजिटल डिटॉक्स ही संकल्पनाही मूळ धरू लागली. त्यातूनच काही जण फेसबुक सोडून जाण्याचा विचार करतात. काही जण काही दिवसांपुरता फेसबुकवरून संन्यास घेतात, तर काही जण मात्र फेसबुकला कायमचाच रामराम ठोकतात. पण फेसबुक अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेट (Facebook Account Deactivation) करायचं की डिलीट करायचं, यात अनेकांचा गोंधळ होतो. तसंच यांपैकी काहीही केलं, तर फेसबुकवर असलेल्या आपल्या डेटाचं काय होणार, हा प्रश्नही अनेकांना सतावत असतो. कारण सध्याच्या काळात आपला डिजिटल डेटा महत्त्वाचा असून तिचा दुरुपयोगही होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर फेसबुक अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेशन आणि फेसबुक अकाउंट डिलीट (Facebook Account Delete) करणं यांमधला फरक जाणून घ्या. फेसबुक अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेट केलं, तर आपलं अकाउंट आणि डेटा (Faceobok Data) राहतो. मात्र आपलं तिथलं अस्तित्व कोणालाही दिसत नाही. पुन्हा काही दिवसांनी विचार बदलला आणि आपण अकाउंट अ‍ॅक्टिव्हेट केलं, तर आपल्या जुन्या डेटासह पुन्हा पहिल्याप्रमाणेच अकाउंट वापरू शकतो. फेसबुक अकाउंट डिलीट केलं, तर मात्र आपलं फेसबुकवरचं अस्तित्वच नाहीसं होऊन जातं. त्यामुळे आपल्या अकाउंटशी निगडित सगळे फोटो, माहिती, कमेंट्स वगैरे सगळ्या गोष्टीही डिलीट होतात.

EXPLAINER : Masked Aadhar Card म्हणजे काय? जाणून घ्या फायदे आणि सुरक्षितता

कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटीमधल्या जर्नालिझम अँड मीडिया कम्युनिकेशन डिपार्टमेंटमधले असिस्टंट प्रोफेसर मायकल हम्फ्राय यांच्या म्हणण्यानुसार, फेसबुक अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेट करायचं असेल किंवा डिलीट करायचं असेल, तरी पहिल्यांदा तिथे असलेला आपला डेटा डाउनलोड करणं आवश्यक आहे. ‘ठरावीक कालावधीनंतर आपल्याला फेसबुकवरचा डेटा डाउनलोड (Downloaded Data) करत राहिलं पाहिजे. कारण तो डेटा पाहून आपल्याला फेसबुकवरच्या आपल्या अ‍ॅक्टिव्हिटीजचा अंदाज घेता येतो. आपल्या अ‍ॅक्टिव्हिटीजना कोणाचा, कसा, किती प्रतिसाद मिळतो, याचाही आढावा घेता येतो. फेसबुक डेटा मोठ्या फाइल्सच्या रूपात डाउनलोड होतो. तो फोल्डरमधून किंवा ऑफलाइन वेब ब्राउजरमधून पाहता येतो. ऑनलाइन फेसबुकच्या माध्यमातूनही तो पाहता येतो,’ असं ते म्हणतात.

तुमचं Facebook Account कसं सुरक्षित ठेवाल? हे सोपे बदल ठरतील फायदेशीर

फेसबुक अकाउंट डिलीट करण्यापूर्वी आपला डेटा डाउनलोड करून घेणं उत्तम, असं मायकल हम्फ्राय सुचवतात. अकाउंट डिलीट केल्यानंतर आपल्याकडचा डाउनलोड केलेला डेटा संपर्करहित होतो. म्हणजेच आपल्या पोस्ट्स, फोटोस व्हिडीओ आणि अन्य माहिती टाइमलाइननुसार दिसते. मात्र त्यावरच्या कमेंट्स, लाइक्स वगैरे दिसत नाहीत. आपण दुसऱ्यांच्या पोस्ट्सवर केलेल्या कमेंट्सही दिसत नाहीत. एखाद्या पोलमध्ये सहभागी झालो असलो, तर त्याची फक्त उत्तरं दिसतात. त्यामुळे अकाउंट डिलीट करायचं झालंच, तर हा सगळा डेटा डाउनलोड करून ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा तो नंतर पुन्हा मिळत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या