EXPLAINER : Masked Aadhar Card म्हणजे काय? जाणून घ्या फायदे आणि सुरक्षितता

EXPLAINER : Masked Aadhar Card म्हणजे काय? जाणून घ्या फायदे आणि सुरक्षितता

आधार कार्ड (Aadhaar Card) हे अत्यंत महत्वाचा दस्तऐवज असल्याने, त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक केला पाहिजे. आधार अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क्ड आधार कार्ड (Masked Aadhaar Card) उपयोगी येते.

  • Share this:

मुंबई, 17 ऑक्टोबर : सध्याच्या काळात आधार कार्ड (Aadhar Card) खूप महत्वाचे आहे. बऱ्याच ठिकाणी आधारकार्डचा वापर हा मुख्य ओळखपत्र म्हणूनही केला जातो. प्रत्येक सरकारी कामात आधार कार्ड आवश्यक आहे. बँकेत खाते उघडण्यासाठी किंवा पासपोर्ट काढण्यासाठी, कोणत्याही सरकारी योजनेचा किंवा अन्य कामाचा लाभ घेण्यासाठी फक्त आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डमध्ये 12 अंकांचा एक युनिक नंबर आहे. या 12 अंकांमध्ये कार्डधारकाच्या ओळखीची संपूर्ण कुंडली नोंदवली जाते.

आधार कार्ड (Aadhaar Card) हे अत्यंत महत्वाचा दस्तऐवज असल्याने, त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक केला पाहिजे. आधार अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क्ड आधार कार्ड (Masked Aadhaar Card) उपयोगी येते. मास्क्ड आधार कार्डावर प्रथम 8 अंक क्रॉससारखे दिसतात. तर उर्वरित शेवटचे 4 नंबर दिसतात. मास्क्ड आधार कार्डचा एक विशेष फायदा आहे. तो म्हणजे, जर तुमचे आधार कार्ड हरवले तरी कोणीही त्याचा गैरवापर करू शकत नाही. तुम्ही तुमचे जुने आधार कार्ड मास्क्ड आधार कार्डमध्ये रूपांतरित करू शकता. हे काम ऑनलाईन सहज करता येते. हे नेमकं कसं करायचं याच्या काही टिप्सही आम्ही देणार आहोत, जेणेकरुन तुमचे काम सहज होईल.

मास्क्ड आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी, तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटीची (UIDAI) वेबसाइट uidai.gov.in वर तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर नोंदवावा लागेल. त्यापूर्वी आपला मोबाइल नंबर आधारशी लिंक केलेला आहे याची खात्री करुन घ्या. जर तुमचा मोबाईल क्रमांक UIDAI मध्ये नोंदणीकृत असेल तर तुम्ही मास्क्ड आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.

असं करा मास्क्ड आधार कार्ड डाउनलोड -

सर्वप्रथम UIDAI च्या uidai.gov.in या वेबसाइटवर जा.

वेबसाइटवर 'डाऊनलोड आधार' या पर्यायावर क्लिक करा.

आता आधार / व्हीआयडी / नाव नोंदणी पर्याय निवडा.

मास्क्ड आधार या पर्यायावर क्लिक करा.

येथे आपल्याला काही महत्वाची माहिती भरावी लागेल.

यानंतर ‘Send OTP’ वर क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठविला जाईल. हा ओटीपीसाठी दिलेल्या जागी भरा आणि submit बटणावर क्लिक करा.

ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला आणखी काही तपशील इथे भरावा लागेल.

तपशील भरल्यानंतर डाउनलोड करण्याचे पर्याय दिसतील, 'आधार डाउनलोड करा' यावर क्लिक करा.

आता तुम्ही तुमचे मास्क्ड आधार कार्ड डाउनलोड करू शकता.

कोणतेही खाजगी दस्तावेज उघडण्यासाठी तुम्हाला पासवर्ड टाकावा लागतो. याच प्रकारे मास्क्ड आधार कार्ड (Masked Aadhaar Card) मिळविण्यासाठी आपल्याला पासवर्ड (Password) प्रविष्ट करावा लागेल. यासाठीचा पासवर्ड डाउनलोड झालेल्या फाईलमध्ये असतो. पासवर्डमध्ये तुमच्या नावाची पहिली चार अक्षरं आणि नंतर जन्म वर्ष असतं.

अशा पद्धतीने तुम्हीही तुमचं मास्क्ड आधार कार्ड डाउनलोड करून वापरू शकता. म्हणजे तुमची सुरक्षितताही राहील आणि तुम्हाला आधारकार्डाचे फायदेही मिळतील.

First published: October 17, 2021, 7:30 AM IST
Tags:

ताज्या बातम्या