मराठी बातम्या » फोटोगॅलरी » टेक्नोलाॅजी » तुमचं Facebook Account कसं सुरक्षित ठेवाल? हे सोपे बदल ठरतील फायदेशीर

तुमचं Facebook Account कसं सुरक्षित ठेवाल? हे सोपे बदल ठरतील फायदेशीर

कोरोना काळात डिजीटल व्यवहारात, सोशल मीडिया (Social Media) वापरात मोठी वाढ झाली असताना, दुसरीकडे फसवणुकीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. फेसबुकवर अनेकांचे प्रोफाईल हॅक करुन, युजरच्या फ्रेंडलिस्टमधील लोकांकडे पैसे मागण्याचं प्रमाण वाढलं आहे. फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी, काही चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी कितीही फायदेशीर ठरत असला, तरी याचा वापर काळजीपूर्वक न केल्यास मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे Facebook Account सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे.