JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / नवीन फोन खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी तपासणं आवश्यक; सरकारकडून महत्त्वाची माहिती

नवीन फोन खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी तपासणं आवश्यक; सरकारकडून महत्त्वाची माहिती

रीफर्बिश्ड मोबाईल विकत घेण्याचा विचार करत असाल, तर त्याची सत्यता पडताळणी करण आवश्क आहे. असा फोन विकत घेताना, आपण खरेदी करत असलेला फोन चोरीचा नाही ना, हे लक्षात घेणं आवश्यक आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 14 मार्च : आजकाल ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) वेबसाईटवर रीफर्बिश्ड मोबाईल फोन खरेदी करण्याचा ट्रेंड वाढला आहे. जवळपास सर्वच शॉपिंग वेबसाईट ग्राहकांना refurbished मोबाईल फोन खरेदीचा पर्याय देतात. हा ट्रेंड पाहून तुम्हीही रीफर्बिश्ड मोबाईल विकत घेण्याचा विचार करत असाल, तर त्याची सत्यता पडताळणी करण आवश्यक आहे. असा फोन विकत घेताना, आपण खरेदी करत असलेला फोन चोरीचा नाही ना, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. भारत सरकारने Refurbished मोबाईल फोन खरेदी करणाऱ्यांचं काम सोपं केलं आहे. त्यामुळे असा फोन खरेदी करताना, तो योग्य आहे की नाही याची माहिती मिळू शकते. भारत सरकारने सेंट्रल एक्विपमेंट आयडेंडिटी रजिस्टर नावाचा एक प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. Central equipment identity register, EMEI नंबरद्वारा तपासणी करतं की, तुम्ही असा खरेदी करत असलेला मोबाईल फोन योग्य आहे की नाही. भारतात सर्व मोबाईल फोन एका 15 digit EMEI number द्वारा विक्री करण्यास मान्यता आहे. या नंबरशिवाय भारतात कोणताही फोन विक्री करणं बेकायदेशीर मानलं जातं. आपल्या फोनचा EMEI नंबर जाणून घेण्यासाठी फोनमध्ये *#06# वर डायल करा.

(वाचा -  तीन दिवसांनंतर SMS सर्विस बंद होऊन कोणताही OTP येणार नाही? )

या नंबरवर डायल केल्यानंतर तुमच्या फोनवर तुमचा EMEI नंबर दिसू लागेल. हा नंबर डायल केल्यानंतर फोनवर कोणतंही उत्तर न आल्यास, तुमचा फोन बेकायदेशीररित्या विक्री करण्यात आला असल्याचं समजेल.

(वाचा -  इलेक्ट्रिक वाहनांच्या जगात पैसे कमावण्याची जबरदस्त संधी; जाणून घ्या काय आहे फंडा )

इनवॉईसही आवश्यक - त्याशिवाय मोबाईल फोनचा EMEI नंबर आपल्या मोबाईल बिल किंवा invoice वरही पाहता येऊ शकतो. ज्या व्यक्तीकडून फोन खरेदी कराल, त्याच्याकडून मोबाईल बिल किंवा invoice ची मागणी करा. जर व्यक्ती बिल देत नसेल, तर भारत सरकार तुम्हाला अशाप्रकारचा फोन खरेदी करण्याचा सल्ला देणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या