न्यूयॉर्क, 11 जून: अमेरिकेत सेक्स ट्रॅफिकिंसाठी (Sex Trafficking on social media) सोशल मीडिया, विशेषतः Facebook चा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचा धक्कादायक रिपोर्ट Human Trafficking Institute ने नुकताच प्रसिद्ध केला आहे. देहविक्रय करण्यासाठी तयार व्यक्तींचा शोध फेसबुकच्या माध्यमातून घेतला जातो आणि त्यांना कामही याच सोशल मीडियावरून मिळतात, असं या रिपोर्टमध्ये उघड झालं आहे. ह्युमन ट्रॅफिकिंग इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात ह्युमन ट्रॅफिकिंग किंवा देहविक्रयासाठी भरीत पाडलेल्या पीडितांपैकी 59 टक्के पीडित फेसबुकवरून निवडले गेले होते. अमेरिकेत देहविक्रयाचा व्यापार 41 टक्के ऑनलाइन चालतो आणि त्यातले 59 टक्के फेसबुकवरून होत असल्याचं यात म्हटलं आहे. ars टेक्निका या वेबसाइटने याबाबत वृत्त दिलं आहे. या रिपोर्टमधून हेही स्पष्ट झालं की यातले 6 टक्के पीडित देहविक्रयासाठी फसवणूकीने किंवा बळाचा वापर करून आणण्यात आले होते. रात्री मित्रांबरोबर दारु पार्टी, सकाळी गँगरेपचा आरोप करत तरुणीची आत्महत्या इतर कुठल्या ना कुठल्या अपरिहार्यतेमुळे या व्यापारात ओढले गेले होते. या पीडितांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्त्रिया आणि मुलीच आहेत. तरुण मुलंही सेक्स ट्रॅफिकिंगच्या जाळ्यात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे फेसबुकच्या माध्यमातून लहान मुलांनाही ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये आणण्यात आलं आहे. सोशल मीडिया आणि मुख्यतः फेसबुकवरून 65 टक्के मुलांची ‘विक्री’ झाल्याचं स्पष्ट झालं. खरं तर अमेरिकेत आता तरुणांना फेसबुकपेक्षा YouTube, Instagram आणि Snapchat ची भुरळ जास्त आहे. तरीही विशेषतः पौगंडावस्थेतल्या मुलांना फेसबुक जवळचं वाटतं आणि त्यातूनच सेक्स ट्रॅफिकिंगच्या जाळ्यात काही जण अडकतात.