नवी दिल्ली, 22 जुलै: आधार कार्ड (Aadhaar Card) सरकारकडून जारी करण्यात आलेलं सर्वात महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे. बँका, पासपोर्ट, शाळा, कॉलेज, रेशन कार्ड, रुग्णालयं सर्वच ठिकाणी आधार कार्ड महत्त्वाचं ठरतं. प्रत्येक आधार कार्डमध्ये एक विशिष्ट ओळख संख्या असते, ज्याला यूनिक आयडेंटिटी नंबर म्हटलं जातं. सध्या हा आधार नंबर सर्वाच्या आयुष्यात महत्त्वाचा आहे. परंतु अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत, ज्यात आधार कार्डचा नंबर बनावट (Aadhaar card fake number) असल्याचं समोर आलं आहे. बनावट-फेक आधार कार्ड बनवून लोकांची फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. यावर रोख लावण्यासाठी UIDAI ने तुमचं आधार कार्ड योग्य आहे की नाही हे ओळखण्यासाठी मार्ग सुचवला आहे. Aadhaar Card असली की नकली? असं ओळखा - सर्वात आधी UIDAI द्वारा लिंक असलेल्या resident.uidai.gov.in/verify वर जा. - इथे आधार कार्डचा 12 अंकी क्रमांक टाका. कॅप्चा कोड भरल्यानंतर Verify वर क्लिक करा. - त्यानंतर तुमचा आधार क्रमांक असली आहे की नकली याची माहिती मिळेल. योग्य असल्यास स्क्रिनवर आधार नंबर Exist लिहिलेलं दिसेल. म्हणजेच तो योग्य आधार क्रमांक आहे.
तसंच ऑफलाईनही याबाबत माहिती घ्यायची असेल, तर आधार कार्डच्या खालील भागात क्यूआर कोड (QR Code) असतो. तो आपल्या मोबाईल स्कॅनरने स्कॅन करुनही माहिती मिळू शकते.
UIDAI ने ट्विट करुन युजर्सला अलर्ट केलं आहे. सर्व 12 अंकी नंबर्स आधार क्रमांक नसतात. त्यामुळेच आधार वेरिफाय करणं गरजेचं ठरतं. त्यामुळे बँकेसंबंधी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी तुम्हाला इतरांच्या आधार कार्डची गरज लागत असल्यास, आधार क्रमांक वेरिफाय करणं आवश्यक आहे.