JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / तुमचं Driving License Aadhaar कार्डशी link आहे का? वाचा काय आहे सरकारचा प्लॅन

तुमचं Driving License Aadhaar कार्डशी link आहे का? वाचा काय आहे सरकारचा प्लॅन

ज्याप्रमाणे आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्सही आधार कार्डशी लिंक (Driving License link Aadhaar Card) करणं फायद्याचं ठरतं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी: आधार कार्डसह (Aadhaar Card) ड्रायव्हिंग लायसन्सही (Driving License) अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. आधार कार्डशिवाय तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा फायदा घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्सशिवायही तुम्ही कोणतंही वाहन चालवू शकत नाही. ज्याप्रमाणे आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्सही आधार कार्डशी लिंक (Driving License link Aadhaar Card) करणं फायद्याचं ठरतं. यामुळे फेक ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती मिळण्यास मदत होते. तसचं तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची योग्य माहिती मिळते. त्यामुळेच सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड लिंक करण्याचे आदेश दिले आहेत. घरबसल्या सोप्या पद्धतीने तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्डशी लिंक करू शकता.

हे वाचा -  एकाच मोबाइल नंबरवरुन तयार होईल संपूर्ण कुटुंबाचं Aadhaar PVC Card, असा करा अर्ज

- सर्वात आधी राज्याच्या परिवहन विभागाची वेबसाइट https://parivahan.gov.in वर जा. - त्यानंतर Link Aadhaar वर क्लिक करावं लागेल. - आता ड्रॉप-डाउनमध्ये Driving License ऑप्शनवर क्लिक करा. - इथे ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर मागितला जाईल. तो नंबर टाइप करा. - त्यानंतर Get Details चा ऑप्शन येईल. इथे तुमचा आधार नंबर आणि मोबाइल नंबर टाकावा लागेल. - आता Submit वर क्लिक करा. सबमिटवर क्लिक केल्यानंतर मोबाइलवर एक OTP येईल. तो टाकल्यानंतर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डशी लिंक होईल.

हे वाचा -  आता घरबसल्या Driving License मध्ये असा बदला Address, RTO मध्ये जाण्याचं No टेन्शन

दरम्यान, ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) महत्त्वाचं डॉक्युमेंट असून सरकारकडून जारी करण्यात येणाऱ्या या डॉक्युमेंटवर सर्व डिटेल्स अपडेटेड असणं गरजेचं आहे. जर तुमचा पत्ता, मोबाइल नंबर बदलला असेल, तर तो आधार कार्डसह सर्व महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सवर अपडेट करण्याचं सांगितलं जातं, जेणेकरुन कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये. तुम्ही घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्सवरील पत्ता अपडेट (Driving License Address) करू शकता. यासाठी RTO ऑफिस जाण्याची गरज भासणार नाही. तसंच एखाद्या एजेंटकडूनही हे काम करुन घेण्यासाठी पैसे भरावे लागणार नाहीत. ऑनलाइन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्सवरील पत्ता बदलता येतो. यासाठी काही पैसे आणि आवश्यक डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या